esakal | पुणे विभागात ॲक्टिव रुग्णांची संख्या २१ हजारांवर
sakal

बोलून बातमी शोधा

The number of corona patients in Ahmednagar district has crossed 80 thousand

पुणे विभागात ॲक्टिव रुग्णांची संख्या २१ हजारांवर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या १९ लाख ६४ हजार ११५ इतकी झाली आहे. त्यापैकी १९ लाख दोन हजार ५६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या ॲक्टिव रुग्णांची संख्या २१ हजार १८ इतकी आहे.

पुणे विभागात आजअखेर एक कोटी ५९ लाख २५ हजार ८४५ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये १९ लाख ६४ हजार ११५ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले. कोरोना बाधित ४० हजार ५३५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, हे प्रमाण २.०६ टक्के आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९६.८७ टक्के आहे.

हेही वाचा: जेलफोडोचा प्रसंग अभिमानास्‍पद, आदर्शवत : वैभव नायकवडी

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११ लाख २३ हजार ८४९ इतकी झाली आहे. त्यापैकी दहा लाख ९६ हजार १४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या ॲक्टिव रुग्णांची संख्या ९ हजार ३६ इतकी आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित १८ हजार ६६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण १.६६ टक्के इतके आहे. तर, बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९७.५३ टक्के आहे.

पुणे विभागातील उर्वरित जिल्ह्यातील स्थिती :

जिल्हा बाधित रुग्ण मृत्यू ॲक्टिव रुग्ण

  • सातारा २ लाख ४३ हजार ६८ ६ हजार ११६ ६ हजार ३२९

  • सोलापूर १ लाख ९६ हजार ६५० ४ हजार ८८८ २ हजार ३४६

  • सांगली १ लाख ९५ हजार ९१ ५ हजार १४० २ हजार १३५

  • कोल्हापूर २ लाख ५ हजार ५७ ५ हजार ७२३ १ हजार १७२

loading image
go to top