Sangli Crime: 'पुण्यातील एकाची २५ लाखांची फसवणूक'; लिंगनूर येथे स्वस्तात सोने देण्याचे आमिष, आठ जणांविरुद्ध गुन्हा
याप्रकरणी लक्ष्मण नाईक (रा. लिंगनूर), प्रेम (वय अंदाजे ३२), राजेश (४५ ते ५०), अन्य एक टोपी घातलेला कन्नड बोलणारा व्यक्ती, शिवा नामक व्यक्ती, पोलिसांची कपडे घालून आलेले दोघे अनोळखी व अन्य एक व्यक्ती अशा ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Fake gold scheme in Lingnur cheats Pune resident of ₹25 lakh; eight booked by police.Sakal
मिरज : लिंगनूर (ता. मिरज) येथे पुण्यातील एकाची स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने सुमारे २५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबद्दल पोलिसांत फिर्याद देण्यात आली. मिरज ग्रामीण पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.