पट्टणकोडोलीत पुजेच्या मानावरून पुजाऱ्यात हाणामारी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जुलै 2019

पट्टणकोडोली - पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील श्री विठ्ठल बिरदेव देवस्थानची पूजा करण्याच्या मानावरून पुजाऱ्यात हाणामारी झाली. आज सकाळी घडलेल्या या घटनेने मंदिर परिसराला पोलिस छावणीचे रूप आले होते. अतिरिक्त पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाटगे यांनी घटनास्थळाला भेट देवून दोन्हीं बाजुच्या लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, श्री विठ्ठल बिरदेव देवस्थानची पूजा करणेवरुन विठ्ठल पुजारी (अंगारे) व धुळगोंडा पुजारी (जानबा) यांच्या भाऊबंदकीत वाद सुरु आहे. धुळगोंडा पुजारी यांनी मंदिरातील पुजेचा मान आता आपल्याकडे आला असून पुजेसाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी काल हुपरी पोलीसांकडे केली होती, तर विठ्ठल बिरदेव देवस्थान समितीनेही विठ्ठल पुजारी याच्या हिस्स्याप्रमाणे ही पुजा असुन जानबा दहशतीच्या जोरावर पुजा करणार आहेत तेंव्हा बंदोबस्त मिळावा असा अर्ज केला होता.

या दोन्हीं अर्जामुळे आज सकाळीच पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अंगारे पुजेसाठी मंदिरात गेले असता जानबा ही तिथे आले. पुजेच्या मानावरून दोन्हीं गटात वाद सुरु झाला. मात्र वाद टोकाला जाऊन प्रचंड हाणामारी सुरु झाली. यामुळे हुपरी पोलीसांनी कोल्हापुरातुन जादा पोलीस कुमक मागवली.

हातकणंगले, गांधीनगर, इचलकरंजी गावभाग व शिवाजी नगर येथुन पोलीस आल्याने मंदिर परिसराला जणु पोलीस छावणीचे रुप आले होते. अतिरिक्त पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाटगे यांनी घटनास्थळाला भेट दिली. दोन्हीं बाजुंच्या लोकांशी चर्चा करुन, ही न्यायप्रविष्ट बाब असल्याचे सांगुन विठ्ठल राघु पुजारी (अंगारे) (वय ४३), धुळगोंडा सिध्दु पुजारी (वय ६२), मंगा सिध्दु पुजारी (वय ५५), बाळू सिध्दु पुजारी (वय ५७) या चार जणांना प्रतिबंधात्मक कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: quarrel between Priests in Pattankodoli