
त्यापेक्षा गोर गरीब जनतेच्या आवश्यक गरजांच्या पुर्ती करीता परस्पर त्यांना मदत करावी अशी आमची आंतरिक तळमळ आम्ही व्यक्त करीत आहोत. तसेच शुभेच्छा देखील स्विकारण्यास आम्ही सातारा मुक्कामी नसणार आहोत.
मला शुभेच्छाही नकाेत : उदयनराजे भाेसले
सातारा : अखिल विश्वाचे पोट भरणाऱ्या बळीराजाच्या न थांबणाऱ्या आत्महत्या, सध्याची राज्यामधील अराजतकडे जाणारी अस्थिर राजकीय परिस्थिती आणि बेरोजगारीने त्रासलेल्या युवा द्विधा मनस्थिती या आणि अशा अनेक बाबींचा विचार करुन आम्ही दरवर्षी राजरा होत असलेला 24 फेब्रुवारीचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शुभेच्छा देखील स्विकारण्यास आम्ही सातारा मुक्कामी नसणार आहोत. त्यामुळे आमच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या तमाम व्यक्तींनी आमच्या वाढदिवसाचा आग्रह धरु नये असे आवाहन माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
वाढदिवस म्हणजे आपल्या आयुष्यातील एक वर्ष सरत असते. खरंतर आम्हांस मुलतः वाढिवस साजरा करण्याची तीव्र इच्छा नसते. परंतु आमच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो कोरोडो मनांचा उत्साह पहिल्यावर तमाम व्यक्तींच्या मनाचा आदर ठेवण्याकरीता यापुर्वी एक दोन वर्ष सोडून अनेक वेळा साजरा केलेला आहे. अशावेळी आम्ही आमच्या वाढदिनी औचित्य साधून जनसेवेच्या कामांचा शुभारंभ अथवा जनसेवेच्या कार्याची पुर्तता करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
तथापि अलीकडच्या काळात जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या आत्महत्या काही केल्या थांबलेल्या नाहीत. तसेच सध्याची राजकीय अस्थिर परिस्थिती पाहता आमचा वाढदिवस साजरा करणे आम्हांस उचित वाटत नाही. तरी आमचा वाढदिवस कोणीही कोणत्याही पद्धतीने साजरा करु नये. त्यापेक्षा गोर गरीब जनतेच्या आवश्यक गरजांच्या पुर्ती करीता परस्पर त्यांना मदत करावी अशी आमची आंतरिक तळमळ आम्ही व्यक्त करीत आहोत. तसेच शुभेच्छा देखील स्विकारण्यास आम्ही सातारा मुक्कामी नसणार आहोत. त्यामुळे आमच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या तमाम व्यक्तींनी आमच्या वाढदिवसाचा आग्रह धरु नये असे आवाहन माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
सविस्तर वाचा : 'हे" सरसावले शिवयारांची भवानी तलवार भारतात आणण्यासाठी
हेही वाचा : ‘कास’वरील शेवाळाला डॉ. वाटवे यांचे नाव
जरुर वाचा : उदयनराजे भाेसलेंचा जनतेस संदेश
अवश्य वाचा : महाराज...आमचे ही रक्त सळसळतंय
Web Title: Udayanraje Bhosale Will Not Celebreate His Birthday
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..