
सोलापूर : राज्य सरकारच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पशुसंवर्धन, स्टेट बोर्ड ऑफ महाराष्ट्र, आरोग्य विभागातील 19 हजार 887 रिक्त पदांसाठी राज्यभरातून तब्बल 18 लाख 29 हजार सुशिक्षित बेरोजगारांनी अर्ज केले. मात्र, विद्यार्थ्यांसह लोकप्रतिनिधींनी महापरीक्षा पोर्टलबाबत तक्रारी केल्याने मेगाभरती थांबविण्यात आली. पोर्टलच्या तक्रारी अन् अडचणींची पडताळणी प्राइट वर्कर सुपर हाउस या अमेरिकन संस्थेतर्फे सुरू असून अद्याप चौकशी अपूर्णच आहे. अर्ज करून वर्षे सरले तरीही नोकरीच्या प्रतीक्षेतील तरुणांसमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही आवर्जुन वाचाच...आतापण असंच का...बळीराजाला करावी लागणार पदरमोड
युती सरकारने शासनाच्या ग्रामविकास, गृह, कृषी, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा विभागांसह जलसंधारण, नगरविकास व आरोग्य विभागातील 72 हजार पदांची मेगाभरती करण्याचा निर्णय घेतला. त्याचे संपूर्ण नियोजन महापरीक्षा सेलकडे देण्यात आले. त्यानुसार महापरीक्षा सेलच्या माध्यमातून नियोजन करून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य व स्टेट बोर्ड ऑफ महाराष्ट्रच्या 19 हजार 887 रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले. पशुसंवर्धन विभागाच्या 729 पदांसाठी तब्बल सव्वातीन लाख तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या 13 हजार 514 पदांसाठी 15 लाखांपर्यंत अर्ज महापरीक्षा सेलकडे प्राप्त झाले. यात खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 500 रुपये तर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 250 ते 300 रुपयांचे परीक्षा शुल्कही भरले, मात्र त्यांना मागील 12 ते 15 महिन्यांपासून परीक्षेची प्रतीक्षाच करावी लागत आहे.
हेही आवश्य वाचाच..माहिती असू द्या...तिरंगा बचाओ आंदोलनाची सोलापुरातून सुरवात
ठळक बाबी...
हेही आवर्जुन वाचाच...नक्की वाचाच...ऍड. प्रकाश आंबेडकरांचे पदाधिकाऱ्यांना पत्र
ऑडीट अहवाल मुख्यमंत्र्यांना होणार सादर
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार प्राइट वर्कर सुपर हाउस या अमेरिकन संस्थेतर्फे महापरीक्षा पोर्टलचे ऑडिट केले जात आहे. मोठमोठ्या आयटी कंपन्यांचे ऑडिट या संस्थेतर्फे केले जाते. ऑडिट पूर्ण झाल्यानंतर अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठविला जाणार आहे.
- अजित पाटील, कार्यकारी संचालक, महापरीक्षा सेल, मुंबई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.