माहिती असू द्या...तिरंगा बचाओ आंदोलनाची सोलापुरातून सुरवात 

tiranga bachav aandolan started by solapur
tiranga bachav aandolan started by solapur

सोलापूर : देशात एनआरसी व सीएएच्या नावाखाली जनतेला विविध रंगात विभाजीत करण्याच्या डाव मोदी सरकारने सुरु केला आहे. दंगलखोर त्यांच्या कपड्यावरुन ओळखले जाऊ शकतील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्‍तव्य देशहितासाठी हानीकारक आहे. या पार्श्‍वभूमीवर तिरंगा बचाओ आंदोलनाची सुरवात सोलापुरातून होणार आहे. त्यासाठी सागर पाटील यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा बचाव संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असून गुरुवारपासून (ता. 9) शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये कॉर्नर सभांचे आयोजन केल्याची माहिती सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


उत्तर प्रदेशात मै बदला लुंगा हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वक्‍तव्य तर पुरे देश मे एनआरसी लागू होगा हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे वक्‍तव्य आणि देश मे एनआरसी लागू करने का प्रयास पुरी जोर से मेरी सरकार करेगी हे पंतप्रधानांचे वक्‍तव्य देशातील लोकशाहीसाठी धोकादायक आहेत, असे श्री. पाटील म्हणाले. दरम्यान, जामिया इस्लामिया विद्यापीठात पोलिसांनी केलेला अमानुष लाठीमार हुकुमशाहीचे लक्षण आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये विद्यार्थी, युवक व महिलांवर घरात घुसून अत्याचार सुरु आहेत. अशा प्रकरणात निष्कारण अनेकांना अडकविण्यात आले असून त्यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत, पोलिस अत्याचाराची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत व्हावी अशा मागण्या तिरंग बचाव संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येणार आहेत. समितीची व्याप्ती वाढविण्यासाठी शहरातील समतावादी, परिवर्तनवादी, लोकशाहीवादी पक्ष, व्यक्‍ती, संघटनांची मंगळवारी (ता. 7) शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित केल्याचेही श्री. पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी उत्तम नवगिरे, दर्शना गायकवाड आदी उपस्थित होते. आंदोलनातील लोकसहभाग वाढावा या हेतूने शहरातील विविध महाविद्यालयांबाहेर कॉर्नर सभा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी जाहीर केले. 


असा राहणार आगामी कार्यक्रम 
9 जानेवारी : वालचंद महाविद्यालयासमोर कॉर्नर सभा (सकाळी 11 ते दुपारी 12) 
10 जानेवारी : दयानंद महाविद्यालयासमोर कॉर्नर सभा (सकाळी 11 ते दुपारी 12) 
11 जानेवारी : सोशल कॉलेजसमोर कॉर्नर सभा (सकाळी 11 ते दुपारी 12) 
12 जानेवारी : सोशल कॉलेज चौकात कॉर्नर सभा (सकाळी 8 ते 10)  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com