मुद्रांकांसाठी भरउन्हात रांगा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

सांगली - मुद्रांक विक्रेत्यांना परवाने नूतनीकरण करून दिले नसल्याने नागरिकांना मुद्रांक मिळण्यात अडचणी येत आहेत. सांगलीत केवळ तीनच विक्रेत्यांचे परवाने नूतनीकरण केल्याने आज त्यांच्याकडे मुद्रांक खरेदी करण्यासाठी भरउन्हात रांगा लागल्या होत्या. मुद्रांकांसाठी तासन्‌ तास रांगेत उभे राहावे लागल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते. 

  जिल्ह्यात नव्याने रेडीरेकनरचे नवे दर १ एप्रिलपासून लागू झाले आहेत. त्या वेळीच महसूल प्रशासनाने विक्रेत्यांना परवाने नूतनीकरण करून देणे आवश्‍यक होते; मात्र प्रशासनाने याबाबत टाळाटाळ केली. सांगलीत केवळ तीनच विक्रेत्यांकडे मुद्रांक विक्रीचे नूतनीकरण केलेले परवाने आहेत. त्यामुळे सकाळी ८ पासून नागरिकांच्या तेथे रांगा लागत आहेत. रांगेत थांबूनही मुद्रांक मिळतील याची खात्री नाही. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. मुद्रांक विक्रेत्यांना दरवर्षी परवाने नूतनीकरण करून घ्यावे लागतात. त्यासाठी मार्च महिन्यातच कागदपत्रांची पूर्तता करून परवाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले होते; मात्र पोलिसांचा ना हरकत दाखला, वर्तणुकीचा दाखला मिळण्यास विलंब झाल्याने परवान्यांचे नूतनीकरण झाले नाही. सध्या सांगलीत ३२ मुद्रांक विक्रेते आहेत. त्यापैकी केवळ तीनच विक्रेत्यांना परवाने नूतनीकरण करून मिळाले आहेत. त्यामुळे केवळ त्यांच्याकडेच मुद्रांक विक्रीस उपलब्ध आहेत.

Web Title: queues for stamp