शासकीय रुग्णालयांत ‘रेबीज’चा तुटवडा

प्रवीण जाधव
गुरुवार, 24 मे 2018

सातारा - जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांत रेबीजच्या लसीचा तुटवडा आहे. त्यामुळे कुत्र्याने चावा घेतल्यावर जायचे कुठे असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांसमोर उभा राहिला आहे. शासकीय दवाखान्यांत लस नसल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. आरोग्य विभागाने यावर तातडीने तोडगा काढणे आवश्‍यक आहे.

काल पाचगणी येथील बारा जणांना कुत्र्याने चावा घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्र- ग्रामीण रुग्णालय ते जिल्हा रुग्णालय अशी त्या रुग्णांची फरफट झाली. रेबीज लस उपलब्ध नसल्यामुळे पाचगणीहून साताऱ्यापर्यंत आलेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयातही लस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे करायचा काय असा प्रश्‍न रुग्णांसमोर निर्माण झाला. जिल्हा शल्यचित्सिकांच्या कानावरही ही गोष्ट घातल्यानंतर स्थानिक पातळीवर खरेदी करून लस आणण्यात आली. त्यानंतर रुग्णांवर उपचार सुरू झाले. कायाकल्प योजनेमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा हा बोजवारा वेदनादायक आहे. भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये सर्वसामान्यांच्या आरोग्य सुविधांची हेळसांड होत असल्याचे वारंवार समोर येत आहे. अनेक प्रकारची औषधे जिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांची परवड होत आहे.

मागणीपेक्षा निम्म्याच लसी उपलब्ध
 राज्यात सर्वत्रच मागणी वाढली आहे. त्या तुलनेत उत्पादन होत नाही. त्यामुळे मागणीपेक्षा निम्म्याच लसी उपलब्ध होत आहे, तरीही स्थानिक पातळीवर खरेदी करून रुग्णांची अडचण सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Web Title: rabies vaccine in government hospital