निपाणी : शर्यंतीच्या खोंडांच्या किमतींची लाखोंची उड्डाणे!

बाजार, शर्यतींकडे लागले लक्ष : खिलार, गायींचेही दर दुप्पट
racing bull
racing bullsakal

निपाणी : कर्नाटकापाठोपाठ महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर सीमाभागातील जनावरांच्या आठवडी बाजारात शर्यतींच्या बैलांच्या किंमतींची लाखोंची उड्डाणे सुरू झाली आहेत. गेली चार वर्षे जाहीर शर्यती बंद झाल्या होत्या. या काळात शर्यतीसाठी प्रसिद्ध म्हणून असलेल्या खिलार वंशावळीतील बैलांच्या आस्तित्वावरच गदा आली होती. मात्र शर्यतींना परवागनी मिळताच निपाणी, चिक्कोडी, संकेश्वर व परिसरात खिलार खोंडांसह शर्यतीच्या बैलांचे दर गगनाला भिडले आहेत. तरीही शर्यती शौकिनांकडून अशा बैलजोड्यांची खरेदी होत आहे. गेल्या आठवड्यापासून निपाणी जनावर बाजारपेठ जातिवंत व शर्यतीच्या बैलांनी गजबजून जात आहे.(bailgada sharyat news)

racing bull
'तू बसतोस की, मी बसू..'; मंचावरच भाजप नेत्यांत राडा

न्यायालयाने शर्यतीवेळी बैलांना शॉक देता येणार नाही, चाबकाचे फटके मारता येणार नाहीत, आजारी बैलांना सहभागी करता येणार नाही, बैल समान उंचीचे असायला हवेत, बैलांवर अत्याचार केल्याचे दिसल्यास कठोर कारवाई होईल, अशा अटी घालत शर्यतीना सशर्त परवानगी दिली आहे. शर्यतींबाबतची अंतिम नियमावली अद्याप गावांपर्यंत पोचलेली नाही. मात्र त्याआधीच गावोगावी शर्यतीची तयारी शिगेला पोहचली आहे. शर्यतीचे शौकीन गावोगावी फिरत असून पळत्या बैलांचा माग काढत आहेत. तशी यासर्वच शौकिनांना आपापल्या भागातील अव्वल पळत्या बैलांची माहिती असते. बंदीच्या काळातही सरावाच्या नावाखाली छुप्या पद्धतीने मैदाने होतच होती. त्यामुळे त्यांना पळत्या बैलांचा अंदाज आहे. बंदी उठताच शौकिंनामध्ये बैल खरेदीसाठी मोठी चढाओढ सुरू झाली आहे. त्याचे परिणाम गावोगावच्या बाजारांमध्येही दिसत आहेत. आटपाडी, मिरज, निपाणी, संकेश्वर येथील जनावर बाजार खिलार जनावरांसाठी प्रसिद्ध आहेत. कोरोनाच्या टाळेबंदीत या बाजारांनाही टाळे लागले होते. मात्र गेल्या २ महिन्याभरापासून बाजार सुरू झाले आहेत. येत्या काही दिवसात सर्वच बाजारात खिलार गायींचे दर भडकणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्याआधीच शर्यतींच्या बैलांचे दर वाढले आहेत.

racing bull
३१ डिसेंबरपासून आठवीपर्यंतच्या शाळा बंद; हिवाळी सुट्ट्या जाहीर

'महिन्यांपूर्वी उमदी येथून बिनदाती खोंड ९७ हजारांना घेतले होते. आता त्याला अडीच लाखांची मागणी आली आहे. न्यायालयाच्या निकालाचा असाही परिणाम झाला आहे. बाजार भडकला आहे. तो स्थिर व्हायला आता काही कालावधी लागेल.'

-मनोहर पाटील,शर्यती शौकीन, कसबा सांगाव

'महाराष्ट्रात बंदी असताना कर्नाटकात शर्यती सुरू होत्या. मैदान गाजवणाऱ्या बैलांच्या किंमती आता भडकल्या आहेत. सर्वच ठिकाणी शर्यती सुरू होणार असल्याने त्यांच्या किंमती चार-पाच लाखांवर जाणार आहेत. आठवडाभरात बैलांच्या किंमती बेहिशेबी वाढल्या आहेत.

-पांडुरंग खोत,बैलजोडी विक्री मध्यस्थ

बैलांचे दर असे

बैलांचे प्रकार जुने दर नवे दर

लहान खोंड ३० ते ५० हजार ५० ते ६५ हजार

बिन दाती खोंड ६० हजार १ ते दीड लाख

शर्यतीचा पळाऊ खोंड २ लाख ३ लाख

वंशावळीची खिलार ४० हजार ७० हजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com