राधाकृष्ण विखे पाटील यांना मातृशोक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा अशी त्यांची ओळख होती. अशोक, राधाकृष्ण आणि राजेंद्र ही तीन मुले त्यांना आहेत. प्रवरानगर येथे आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

नगर : भाजप नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मातृशोक झाला असून, त्यांच्या मातोश्री सिंधूताई विखे पाटील यांचे आज (रविवार) पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.

प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा अशी त्यांची ओळख होती. अशोक, राधाकृष्ण आणि राजेंद्र ही तीन मुले त्यांना आहेत. प्रवरानगर येथे आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

सिंधूताई यांनी 1988 मध्ये प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळाची स्थापना केली होती. त्यांनी या महिला मंडळासह प्रियदर्शनी सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय, ग्रामीण महिलांसाठी बिगरशेती सहकारी पतसंस्था सुरु केली. महिला जनजागृतीसाठी त्यांनी विविध कार्यक्रम घेतले. सिंधूताईंच्या कार्याबद्दल त्यांना राज्य सरकारकडून 1999 मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात आला होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Radha Krishna Vikhe Patil Mother Sidhutai Vikhe Patil passes away