शेतकरी आत्महत्यांची जबाबदारीही पवारांनी स्वीकारावी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

पाण्याचे योग्य नियोजन करावे
महाराष्ट्रातील पाण्याचे योग्य नियोजन झाले तर महाराष्ट्रासह जवळच्या राजातील पाण्याचे प्रश्न सुटणार आहेत.शेतकरी विरोधी कायदा केंद्र सरकारने बदलला पाहिजे. शेतकरी सुखी तर देश सुखी हे राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे. मोदी सरकारने समस्या सोडविण्याएेवजी वाढविल्या आहेत. शेतकरी संकटात असताना आपला देश महासत्ता कसा होणार. केवळ निवडून आलेले लोक ठरवतील तेच धोरण हे शेतकरी संघटनेस अमान्य आहे.
-  रघुनाथ पाटील, शेतकरी संघटना 

सोलापूर ः शेती उद्योगातील क्रांतीचे श्रेय घेत असतानाच शेतकऱ्यांच्या आत्मह्त्यांची जबाबदारीही शरद पवार यांनी स्वीकारावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी केली. 

हेही वाचा - रुपयाचाही भाव नसल्याने बोराच्या बागेवर नांगर 

मोदी नेहरूंचा वारसा चालवत आहेत 
श्री. पाटील गुरुवारी सोलापुरात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. श्री. पाटील म्हणाले, राज्य सरकारमधील नाव बदलली आहेत. बाकीचे सर्वकाही तसेच आहे.
शेतकरी बदलली जात आहेत, धोरणे मात्र तीच कायम आहेत. पंडीत नेहरूंनी जी शेतकरी विरोधी भूमिका घेतली, तोच वारसा पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे चालवित आहेत. 

हेही वाचा - पुन्हा इथे आलात तर..

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात अपयश
शरद पवार जाणते राजे आहेत. पन्नास वर्षे राजकारणात आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरवातीची पंधरा वीस वर्षे शेतकर्यांच्या आत्महत्या नव्हत्या. गेल्या 40 वर्षांत पवार राजकारणात  आले, तसे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रकार वाढले. विकासकामांचा मोठेपणा ते जसे घेतायेत, आम्ही मोठेपणा द्यायला तयार आहोत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात त्यांना अपयश आले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे पाप हे त्यांचेच आहे, असेही पाटील म्हणाले.

स्वामीनाथन आयोगाचा आग्रह का नाही 
महाराष्ट्राच्या राजकारणात गेली 50 वर्षे सक्रीय असलेल्या पवार याना विविध कामांचे मोठेपण दिले जात आहे. मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्येची जबाबदारी मात्र ते घेत नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी कधी आक्रमक भूमिका घेतली आहे का, स्वामीनाथन आयोग शिफारसी लागू करण्यासाठी आग्रही भूमिका का घेतली नाही. पवार प्रगतीचे श्रेय घेत असतील तर शेतकरी आत्महत्येचं पापही स्वीकारलं पाहिजे. अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे पाप कोणाचे हे तरी सांगितले पाहिजे, असेही रघुनाथ पाटील म्हणाले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raghunath patil press in solapur