esakal | कोंबडी चोराने दूध संघ बुडवला; रघुनाथदादांचा हल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

कोंबडी चोराने दूध संघ बुडवला; रघुनाथदादांचा हल्ला

कोल्हापूर - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कडकनाथ घोटाळा तर केलाच; पण धुळ्यातील दूध संघही बुडवला. तसेच माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेकडो एकर जमीन लाटली. त्यामुळे नाव स्वाभिमानी आणि काम बेईमानी, असा उद्योग या दोन्ही नेत्यांनी चालवल्याचा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. महापुराने शेतकऱ्यांचे नुकसान जेवढे केले नाही, तेवढे नुकसान या शेतकरी नेत्यांनी केल्याचा आरोपही त्यांनी केला.

कोंबडी चोराने दूध संघ बुडवला; रघुनाथदादांचा हल्ला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कडकनाथ घोटाळा तर केलाच; पण धुळ्यातील दूध संघही बुडवला. तसेच माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेकडो एकर जमीन लाटली. त्यामुळे नाव स्वाभिमानी आणि काम बेईमानी, असा उद्योग या दोन्ही नेत्यांनी चालवल्याचा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. महापुराने शेतकऱ्यांचे नुकसान जेवढे केले नाही, तेवढे नुकसान या शेतकरी नेत्यांनी केल्याचा आरोपही त्यांनी केला.

पाटील म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने शरद जोशींनी अर्थकारण शिकवले. काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला शहाणे करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांनी आयुष्यात कधी भ्रष्टाचाराला थारा दिला नाही. त्यामुळेच अस्वस्थ झालेल्या शेट्टींनी वेगळी चूल मांडली. संघटनेत फूट पाडून शेतकरी चळवळीची वाट लावण्याचे पाप शेट्टींनी केले.’’

सध्या कडकनाथ घोटाळ्याची चर्चा सुरू आहे. या घटनेशी मंत्री सदाभाऊ खोत यांचे नाव जोडले आहे; मात्र ते मंत्री झाल्यावरच हे उद्योग करण्यास शिकलेले नाहीत. ‘स्वाभिमानी’त असल्यापासून ते असला उद्योग करत असल्याचा टोला त्यांनी लावला. कडकनाथ घोटाळ्यापेक्षाही जमिनीचा घोटाळा मोठा आहे. राजू शेट्टी यांनी शाहूवाडीत २०० एकर, गडहिंग्लज तालुक्‍यातील मांडुकली येथे २०० एकर, तर राधानगरीत १२५ एकर जमीन घेतल्याचा आरोपही पाटील यांनी केला.

गोरगरिबांच्या जमिनी घेण्याचा उद्योग शेतकरी नेत्यांनी केला. एवढ्या मोठ्या प्रमाणात जमीन घेण्याइतका पैसा यांच्याकडे आला कोठून? असा सवालही त्यांनी केला, तर शेट्टी यांनी कर्नाटक येथे मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष ॲड. माणिक शिंदे यांनी केला.

पंढरपुरात शेतकरी परिषद
शेतकरी संघटनेचे जनक शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त ३ सप्टेंबरला पंढरपूर येथे शेतकरी परिषद होणार आहे. यात आपत्ती निवारण कायद्यात दुष्काळ, महापुराचा समावेश करावा, भूसंपादन, कमाल जमीन धारणा कायदा आदी कायदे रद्द करण्याचे ठराव करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर दूध दरवाढ करण्याचा ठरावही होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

loading image
go to top