भाजप महानगर प्रभारी जिल्हाध्यक्षपदी राहुल चिकोडे

भाजप महानगर प्रभारी जिल्हाध्यक्षपदी राहुल चिकोडे

कोल्हापूर - भारतीय जनता पक्षाच्या महानगर प्रभारी जिल्हाध्यक्षपदी राहुल चिकोडे यांनी नेमणूक करण्यात आली. यापूर्वी चिकोडे हे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. आगामी विधानसभा निवडणूक आता त्यांच्याच नेतृत्वाखाली जिल्ह्यात लढली जाणार आहे. ही महत्त्वाची जबाबदारी चिकोडेेंवर आली आहे.

चिकोडे यांनी १९९७ मद्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी या माध्यमातून लोकांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. या कामाची दखल घेत त्यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी युवकांचे संघटन यशस्वीरीत्या केले. मंगळवार पेठ मंडलचे अध्यक्षपदी ही त्यांनी काम केले.

विविध सामाजिक, विकासाच्या प्रश्नांवर त्यांनी लोकांना सोबत घेऊन कार्य केले.पक्षवाढीसह आपल्या कार्याचे क्षेत्र वाढवून पक्ष लोकांपर्यत नेऊन केलेल्या कामामुळे वरिष्ठ नेत्यांनी त्यांची भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस म्हणून त्यांची नेमणूक कऱण्यात आली. पालकमंत्री  चंद्रकांत पाटील यांच्या पदवीधर मतदार संघ निवडणुकीची त्यांनी यशस्वी धुरा सांभाळली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मुशीत त्यांची जडणघडण झाली. 

संघटनात्मक कामगिरी
चिकोडे ग्रंथालयाच्या माध्यमातून त्यांनी नवऊर्जा महोत्सव, विज्ञानाधिष्ठित पिढी घडविण्यासाठी एसडीएनएक्‍स (SDNX) इनोव्हेशन लॅब, आडवाटेवरचे कोल्हापूर असे विविध उपक्रम राबविले. नजीकच्या काळात ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सदस्य व भारत स्काऊड गाईडचे आयुक्त म्हणून एक वेगळी जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्यावर पक्षाने आता प्रभारी जिल्हाध्यक्ष ही मोठी जबाबदारी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com