राधानगरीमधून सर्वसामान्यांचे नेतृत्व म्हणून 'हे' लढण्यास इच्छुक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

गारगोटी - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून मी कार्यरत आहे. सर्वसामान्यांचे नेतृत्व म्हणून मी निवडणूक लढणार असून, राधानगरी विधानसभा मतदारसंघाच्या व सर्वसामान्यांच्या विकासासाठी साथ द्या, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल देसाई यांनी केले. 

येथील संपर्क कार्यालयात आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बिद्री साखर कारखान्याचे संचालक धोंडिराम मगदूम होते. संचालक प्रदीप पाटील, तालुका संघाचे उपाध्यक्ष एम. डी. पाटील प्रमुख उपस्थित होते. मुंबईत रविवारी होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेळावा नियोजनावर बैठकीत चर्चा झाली.    

नगरसेवक बाळ केसरकर, प्रदीप पाटील, शिवराज देसाई, अनिल तळकर, किरण कुरडे, सदाशिव देवर्डेकर, प्रकाश वास्कर, शांताराम तौंदकर यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच संदेश भोपळे, संजय देसाई, अर्जुन केणे, बाळासो आरडे, नारायण पाटील, अशोक जगताप, प्रताप मेंगाणे, जितेंद्र भाट, सचिन देसाई, पांडुरंग डेळेकर, गोपाळ कांबळे, हिंदुराव देसाई, सिराजदिन देसाई, सुरेश खोत, शिवाजी मातले, शहाजी ढेरे, पापा देसाई आदी उपस्थित होते. बजरंग कुरळे यांनी आभार मानले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Desai contestant from Radhanagari Constituency