esakal | भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी राहुल महाडीक
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Mahadik selected as the State Vice President of BJP Yuva Morcha

वाळवा पंचायत समितीतील गटनेते राहुल महाडीक यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली. मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी निवडीचे पत्र स्विकारले. 

भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी राहुल महाडीक

sakal_logo
By
शांताराम पाटील

इस्लामपूर (जि. सांगली) : वाळवा पंचायत समितीतील गटनेते राहुल महाडीक यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली. मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी निवडीचे पत्र स्विकारले. 

जिल्ह्यात सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात कमी काळात छाप पाडणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ते शिक्षण व क्रेडिट सोसायटी, सूतगिरणीच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. येलूर जि. प. गटातून ते सर्वात कमी वयाचे सदस्य म्हणून निवडून आले. पाच वर्षात त्यांनी कामातून विकास दाखवून दिला.

येलूरने स्वच्छता अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. प्रभावी जिल्हा परिषदेतील सदस्यांच्या यादीत त्यांचे नाव घेतले जाते. येलूर गटावर मजबूत पकड आहे. बंधू सम्राट यांच्याबरोबर दहीहंडी, गौरी महोत्सव, नोकरी मेळावा, स्पर्धा आयोजित केल्या. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेत सलग तीन वर्षे झाले. महाराष्ट्र तंत्रनिकेतन आयोजित कार्यक्रम त्यांच्याच मार्गदर्शनाखाली होतात. 

ग्रामीण भागासाठी वनश्री नानासाहेब महाडिक मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी स्थापना केली. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात 21 शाखांच्या माध्यमातून ऑडिट वर्ग "अ' मध्ये संस्था वाटचाल करीत आहे. ऑल इंडिया मल्टिस्टेट असोसिएशनमध्ये त्यांनी कार्य सुरू केले आहे. त्यांच्या शिक्षण संस्थेत चार हजार विद्यार्थी शिकताहेत. पं. स. व जि. प. च्या माध्यमातून प्रखर विरोधक म्हणून उभे राहणारे भाजपात गेल्यावर अधिक क्रियाशील व सक्रिय झाले. विविध आंदोलनात त्यांनी भाग घेतला. भाजपच्या वाढीसाठी ते विशेष प्रयत्न करीत आहेत. 

युवक संघटनेचे माध्यमातून, उद्योग समूहाच्या गावोगावी व घराघरांत भाजपा पोहचवण्यासाठी गाव तिथे शाखा व घर तिथे भाजपा असे अभियान राबविण्याचा संकल्प आहे. 

श्री. महाडीक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार सदाभाऊ खोत, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजपच्या सर्व राज्यातील नेत्याचे संधी दिळ्याबद्दल आभार मानले. युवकांचे संघटन करून प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत राहू, असे सांगितले. 

संपादन : युवराज यादव