"अंनिस' च्या राहुल थोरात यांना धमकी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

सांगली - अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे पदाधिकारी राहुल थोरात यांना विशाल गोरडे नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून खानदान संपवून टाकण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. या धमकीचा सोशल मिडियावरून अनेकांनी निषेध केला. दरम्यान, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांना भेटून तक्रार देणार असल्याची माहिती श्री. थोरात यांनी दिली. 

"अंनिस' चे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला काल (ता. 20) पाच वर्षे पूर्ण झाल्याबद्दल "जवाब दो' आंदोलन राज्यात अनेक ठिकाणी करण्यात आले. आंदोलनाची बातमी एका फेसबुक पेजवर प्रसिद्ध झाली. त्यावर विशाल गोरडे या फेसबुक अकाऊंटवरून डॉ. दाभोलकर यांच्याविषयी बदनामीकारक प्रतिक्रिया आली. त्यामुळे सांगलीच्या पोलिस अधीक्षकांनी तत्काळ कारवाई करावी, असे उत्तर थोरात यांनी दिले. तेव्हा गोरडेने पुन्हा श्री. थोरात यांना "तुझे खानदान संपवून टाकीन' अशी धमकी दिली. 

श्री. थोरात यांना मिळालेल्या धमकीचा आज सोशल मिडियावर अनेकांनी निषेध केला. थोरात यांच्या पाठीशी आहोत, असे म्हटले आहे. धमकीबाबत पोलिस अधीक्षक शर्मा यांना भेटून तक्रार करण्याचे ठरले आहे. 

Web Title: Rahul Thorat Threat on facebook