मसाज पार्लरवर छापा; दोन महिलांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मार्च 2017

कोल्हापूर - शाहूपुरीतील पाच बंगला परिसरात मंजुळा अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या गुलमोहर मसाज पार्लरवर आज सायंकाळी पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले. शिल्पा देशमुख (वय 30) आणि अनुराधा देशमुख (30, रा. गोकुळ शिरगाव) अशी त्यांची नावे आहेत. शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे. 

पोलिसांनी सांगितले, की मसाज करून मिळेल अशी छोटी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या जाहिरातीत केवळ मोबाइल क्रमांक दिला होता. तेथे अनैतिक प्रकार चालत असावेत या संशयातून श्री. राणे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत या क्रमांकावर संपर्क साधला. नेमका पत्ता विचारून घेतला. शाहूपुरी पाच बंगला परिसरातील मंजुळा अपार्टमेंट असा पत्ता फोन घेतलेल्या व्यक्तीने सांगितला. गुलमोहर फिटनेस सेंटर असे नावही सांगण्यात आले. तेथे खरोखरच मसाज पार्लर सुरू आहे काय याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी तेथे एक बनावट गिऱ्हाईक पाठवून दिले. त्याला तेथे शिल्पा आणि अनुराधा नावाच्या दोन महिला भेटल्या. त्यांनी या गिऱ्हाईकाकडून दोन हजार रुपये घेतले आणि एका 24 वर्षीय तरुणीला त्याच्या स्वाधीन केले. याच वेळी श्री. राणे यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील दोन अधिकारी आणि कर्मचारी तेथे पाठवून छापा टाकला. शिल्पा आणि अनुराधा या दोघींना ताब्यात घेतले. रात्री उशिरा त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती श्री. राणे यांनी दिली. पीडित मुलीला वेश्‍या व्यवसाय करणे भाग पाडल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. 

Web Title: Raid on Massage parlor