कराडमध्ये खाद्यतेल व रिपॅकींग करणाऱ्या दुकानांवर छापे

कराडमध्ये खाद्यतेल व रिपॅकींग करणाऱ्या दुकानांवर छापे

कऱ्हाड- दसरा, दिवाळी सणाच्या पार्श्वभुमीवर शहरातील पाच खाद्यतेल व रिपॅकींग करणाऱ्या दुकानांवर छापा टाकून अन्न व औषध प्रशासन विभागाने सुमारे 83 लाख 63 हजार किमतीचा एक लाख 655 किलो तेलाचा साठा जप्त केला आहे. पाच दुकानात झालेल्या तपासाणीत रिफाईन्ड सोयाबिन तेल, रिफाईन्ड सनफ्लॉवर तेल, रिफाईन्ड पामोलिन तेलाच्या साठ्याचा समावेश आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या छाप्यामुळे येथे खळबळ उडाली आहे. 

संबधित दुकानात खाद्यतेल भेसळीच्या संशयावरुन तपासणी झाली आहे. तेथे तपासणी करुन त्या दुकानात तेल नमुणे चाचणीसाठी अद्यावत प्रयोगाशाळा नव्हती. तेथे जुन्या डब्यांचा वापर होत होता, खाद्य तेल खेरदी व विक्री केल्याचे तपशिल त्यांच्याकडे नव्हते. आदी दोष त्या दुकानात आढळून आल्याचे सातारा येथील अन्न व औषध विभागातून सांगितले. येथील मार्केट यार्डातील चार दुकांनावर चापा टाकण्यात आला. त्यात मधुर ट्रेडर्समधून 33 हजार 874 किलोचा सुमारे 26 लाख 93 हजार 156 रूपयांचा साठा जप्त केला आहे.

सिध्देश्वर ऑईल इंडस्ट्रीजमध्ये छापा टाकून तेथून 11 हजार 748 किलोचा 9 लाख 14 हजार 253, शिवलिंग नागाप्पा घेवारी येथे छापा टाकून 24 हजार 709.4 किलोचा 23 लाख 68 हजार 855, मधुर एंटरप्रायजेसमध्ये 20 हजार 803.6 किलोचा सुमारे 16 लाख 16 हजार 004 तर मलकापूरातील गणेश ट्रेडर्समध्ये छापा टाकून तेथून 9 हजार 521.1 किलोचा सुमारे 7 लाख 71 हजार 209 रूपायांचा साठा जप्त झाला आहे.

कारवाईत कारवाई सह आयुक्त (अन्न) पुणे विभाग सुरेश देशमुख, एस. एम. देशमुख अनन्न्‌ सुरक्षा अधिकारी उल्हास इंगवले, अरुण धेळे, ए. एस. गवते, एस. एस. सावंत, आर. आर. शहा, वाय. टी. ढेंबरे, ए. ए. पवार, व्ही. एस. सोनवणे, आर. एम. खंडागळे यांच्या पथकाने केली. जप्त नमुने तपसामी व अन्य विश्‍लेषणांसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल मिळाल्यानंतर संबधितांवर कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायुक्त एस. बी. कोडिगिरे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी भेसळीबाबत काही शंका आढळल्यास अन्न व औषध प्रशासन विभाग सातारा येथे संपर्क साधण्याचे आवाहनही सहायक आयुक्त कोडिगिरे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com