रेल्वेतर्फे होणार 40 मेगावॅट वीजनिर्मिती 

तात्या लांडगे
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

सोलापूर : रेल्वे विभागाच्या देशभरातील हजारो हेक्‍टरवर सध्या अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वेने अशा जागांवर सौरऊर्जा निर्मितीचे पॅनल उभारून वीजनिर्मिती करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार सोलापूर विभागातील रेल्वेच्या 100 एकर जागेवर सोलर पॅनल उभारून त्याद्वारे दररोज 40 मेगावॅट वीज तयार केली जाणार आहे. त्याचे काम सप्टेंबर महिन्यापासून सुरू केले जाणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

सोलापूर रेल्वे स्थानकाजवळील मोकळ्या जागेवर बसविण्यात येणाऱ्या सौर पॅनलवरून तयार केलेली वीज रेल्वे कार्यालये, रेल्वे स्थानक, दवाखाने आदींना दिली जाणार आहे. शिल्लक वीज महावितरणला विक्री करण्यात येणार आहे. सध्या विद्युत विभागाकडून जागेची पाहणी सुरू असून जागा निश्‍चितीनंतर सोलर पॅनल बसविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. रेल्वेच्या मीटरगेज व दौण्ड वसाहतीजवळील जागेचाही त्यात समावेश आहे. त्या जागांवर आता वृक्षारोपण, सोलर पॅनल बसवून ही जागा अतिक्रमणाच्या तावडीतून सोडविण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 

ठळक बाबी... 
- पहिल्या टप्प्यात 40 हेक्‍टरवर सोलार पॅनल बसविण्याचे नियोजन 
- सप्टेंबर 2018पासून प्रत्यक्ष कामाला होणार सुरवात 
- दररोज 40 मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट 
- रेल्वे स्थानके, कार्यालये आणि दवाखान्यांना वीज विक्रीचे नियोजन 
- सोलापूर, गुलबर्गा, कुर्डुवाडी, दौण्ड, साईनगर (शिर्डी), वाडी स्थानकावरही सोलर पॅनल 
- रेल्वेच्या जागांवरील अतिक्रमण रोखण्याकरिता नवा प्रयोग 

सोलापूर विभागातील अनेक रेल्वे स्थानकांवरील कव्हर शेडवर सोलर पॅनल बसविले जाणार आहेत. सोलापुरातील 40 हेक्‍टर जागेवर सोलर बसविण्याची कार्यवाही लवकरच सुरू होईल. 
- व्ही. के. सिंग, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता 

Web Title: railway creates 40 megawatts electricity