बंद लोहमार्गावर धावली रेल्वे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जून 2019

पुण्याहून मिरजेला निघालेली रेल्वे मालगाडी कऱ्हाड रेल्वे स्थानकावरील बंद असलेल्या लोहमार्गावरून धावली. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. रेल्वे स्थानकावर सिग्नलची संभ्रमावस्था झाल्याने रेल्वे बंद असलेल्या लोहमार्गावरून धावली. त्या प्रकाराची रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे सविस्तर चौकशीअंतीच त्याबाबतची माहिती सांगता येईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ओगलेवाडी - पुण्याहून मिरजेला निघालेली रेल्वे मालगाडी कऱ्हाड रेल्वे स्थानकावरील बंद असलेल्या लोहमार्गावरून धावली. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. रेल्वे स्थानकावर सिग्नलची संभ्रमावस्था झाल्याने रेल्वे बंद असलेल्या लोहमार्गावरून धावली. त्या प्रकाराची रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे सविस्तर चौकशीअंतीच त्याबाबतची माहिती सांगता येईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पुण्याहून मिरजला जाणाऱ्या मालगाडीस ४२ डबे होते. त्या डब्यातून युरिया खताची पोती होती. घटनेची प्राथमिक चौकशी पूर्ण केल्यावरच नेमका प्रकार कशामुळे घडला, त्याचे कारण स्पष्ट केले जाईल, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. दिवसभर प्रवासी गाड्यांची वाहतूक सुरळीत होती. तथापि या लोहमार्गाने गाड्या विलंबाने धावत होत्या. कऱ्हाड रेल्वेस्थानकाजवळ सकाळी साडेअकराच्या २०३-८-९ असा किलोमीटरचे ठिकाण दाखवणाऱ्या निशाणीजवळ घटना घडली. त्याआधी रेल्वे सिग्नल यंत्रणेने गाडीस पुढे न जाण्याचा सावधानतेचा इशारा दिला होता, तरीही गाडी बंद रेल्वे मार्गावरून धावली. मार्ग संपला असताना पुढे जमिनीवर ५० मीटरवर फरफटत जाऊन मार्गावर असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर गाडीचे पुढील इंजिन तेथे आदळले आणि गाडी थांबली. गाडीस दोन इंजिन असल्याने गाडीचे डबे रुळावरून घसरले नाहीत. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railway go on Close Railway Track