रेल्वे, विमानसेवा 3 मेपर्यंत राहणार बंदच

Railways, airlines remain closed until May 3
Railways, airlines remain closed until May 3
Updated on

बेळगाव ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश 3 मेपर्यंत लॉकडाऊन असणार असल्याची घोषणा मंगळवारी (ता.14) केली. यामुळे देशाअंतर्गत व विदेशातील सर्व विमानसेवा व देशातील प्रवासी रेल्वेसेवा 3 मेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन तिकीट सेवा बंद राहणार असल्याचे रेल्वे व नागरी उड्डाण मंत्रालयाने सांगितले आहे. 

कोरोनामुळे देशात खबरदारी घेण्यात येत आहे. यामुळे 21 मार्चपासून रेल्वे व विमानसेवा पूर्ण बंद करण्यात आली आहे. पहिल्या टप्यात 31 मार्चपर्यंत या सेवा बंद होत्या मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 14 एप्रिलपर्यंत देश बंद असणार असल्याची घोषणा केल्यामुळे 15 एप्रिलनंतर धावणाऱ्या रेल्वे व विमानसेवेचे ऑनलाईन बुकींग सुरु करण्यात आले होते. यामुळे 15 एप्रिलनंतर रेल्वे व विमानसेवा धावतील अशी आशा होती मात्र, कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव वाढत असल्याने पंतप्रधान मोदींनी 3 मेपर्यंत देश बंद राहणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे सर्व विमानसेवा व रेल्वेसेवा बंद राहणार आहेत. 

या बंदमुळे रेल्वेच्या प्रीमियम गाड्या, मेल/एक्‍स्प्रेस, पॅसेंजर, उपनगरी गाड्या, कोलकाता मेट्रो रेल, कोकण रेल्वे इत्यादी भारतीय रेल्वेवरील सर्व प्रवासी रेल्वे रद्द केल्या आहेत. रद्द झालेल्या गाड्यांच्या बुकींगच्या तिकिटांसाठी पूर्ण परतावा देण्यात येणार आहे. पुढील आदेश होईपर्यंत 3 मेपर्यंत ई-तिकिटांसह कोणत्याही प्रकारचे बुकींग केले जाणार नाही. तिकीट बुकींग ऑनलाईन रद्द करण्याची सुविधा कार्यरत राहील. 3 मेपर्यंत रद्द झालेल्या गाड्यांचा परतावा रेल्वेकडून ग्राहकांना स्वयंचलितपणे ऑनलाईन मिळेल तर ज्यांनी काऊंटरवर बुकिंग केली आहे त्यांना 31 जुलैपर्यंत परतावा मिळेल. देशाच्या विविध भागात आवश्‍यक पुरवठा सुनिश्‍चित करण्यासाठी वस्तू आणि पार्सल गाड्यांची सेवा कायम राहणार आहे. 


सांबरा विमानतळाला सूचना 

15 तारखेनंतर धावणाऱ्या विमानांचे काही कंपन्यांनी बुकींग केले होते. मात्र, देश 3 मेपर्यंत लॉकडाऊन असल्याने सर्व देशाअंतर्गत व विदेशातील विमान सेवा बंद असणार आहेत. यासंबंधी सांबरा विमानतळाला सूचना आलेल्या आहेत. 

-राजेशकुमार मौर्य, संचालक, सांबरा विमानतळ, बेळगाव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sonam Wangchuk Sangli Women latest news
Why is Afzal Khan statue delayed at Pratapgad Fort
Chandoli Sanctuary monsoon tourism guide
Sadabhau Khot latest political statement
Marathi News Esakal
www.esakal.com