रेल्वेने सुरू केले  पैसे वाटप ः वाचा कुणाला 

download (2).jpg
download (2).jpg

मिरज (सांगली) ः कोरोना रोगामुळे लागू केलेल्या लॉकडाऊन काळातील आरक्षित झालेल्या रेल्वे तिकिटांचे पैसे रेल्वे प्रशासनाकडून परत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये 22 मार्च पासून ते 30 जून पर्यंत अरक्षित केलेल्या तिकिटांचे पैसे रेल्वे प्रशासनाकडून जाहीर केलेल्या तारखेस मिरज रेल्वे स्थानकातून परत दिले जाणार आहेत. लॉकडाऊनमुळे मिरज रेल्वे स्थानक 22 मार्च पासून आज तागायत तब्बल दोन महिने बंद असल्यामुळे लॉकडाऊन काळात अरक्षित केलेल्या प्रवाशांच्या तिकिटांचे पैसे परत मिळविण्यासाठी तिकीट अरक्षित केंद्रावर प्रवाशांनी आजपासून गर्दी केली होती. 

प्रवाशांनी रेल्वे पुणे, मुंबईसह इतर ठिकाणी जाण्यासाठी अरक्षित केलेल्या तिकिटांसाठी रेल्वे प्रशासनाकडून जाहीर केलेल्या तारखेस तिकिटांचे पैसे परत मिळतील. सध्या रेल्वे प्रशासनाकडून एक जूनपासून रेल्वे सुरू करण्यात आली आहे. मात्र सुरू करण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांमध्ये राज्यांतर्गत एकही गाडी धावणार नाही.

पण मिरज रेल्वे स्थानकातून गोवा ते निजामुद्दीन आणि यशवंतपूर निजामुद्दीन या दोन गाड्यांचा समावेश आहे. या दोन्ही गाड्यांची तिकीट अरक्षित करण्यासाठी मिरज रेल्वे स्थानकावर आरक्षण खिडकीची सोय केली आहे. मात्र या गाड्या पुणे, सातारा, कऱ्हाड, मिरज या ठिकाणी प्रवासी परराज्यातील प्रवासी घेण्यासाठी थांबणार असून प्रवाशांनी अरक्षित केलेल्या ठिकाणीच उतरावे आणि गाडीमध्ये चढावे लागणार आहे. शिवाय पुणे ते मिरज येथील प्रवाशांसाठी या गाड्यांचे अरक्षण सध्यातरी उपलब्ध नाही. मात्र राज्याबाहेरील प्रवाशांना या गाड्यांचा लाभ घेता येणार आहे. 


अरक्षित तिकिटाचे पैसे कसे मिळतील 
22 मार्च ते 31 मार्च पर्यंत अरक्षित तिकिटांचे पैसे 25 मे पासून मिळतील. 
1 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत अरक्षित तिकिटांचे पैसे 1 जून पासून मिळतील. 
15 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत अरक्षित तिकिटांचे पैसे 7 जून पासून मिळतील. 
1 मे ते 15 मे पर्यंत आरक्षित तिकिटांचे पैसे 14 जून पासून मिळतील. 
16 मे ते 30 मे पर्यंत आरक्षित तिकिटांचे पैसे 21 जून पासून मिळतील. 
1 जून ते 30 जून पर्यंत आरक्षित तिकिटांचे पैसे 28 जून पासून मिळतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com