पाऊस आला धावून.. रस्ते गेले वाहून ः पहा कुठे 

शंकर भोसले 
Friday, 10 July 2020

मिरज (सांगली) ः शहरात काल दिवसभर पडत असलेल्या पावसामुळे शास्त्री चौकातील रस्ते पुन्हा चिखलमय झाले आहेत. त्यामुळे सरी आल्या धावून अन...रस्तेच गेले वाहून अशीच अवस्था रस्त्यांची झाली आहे.

मिरज (सांगली) ः शहरात काल दिवसभर पडत असलेल्या पावसामुळे शास्त्री चौकातील रस्ते पुन्हा चिखलमय झाले आहेत. त्यामुळे सरी आल्या धावून अन...रस्तेच गेले वाहून अशीच अवस्था रस्त्यांची झाली आहे.

कर्नाटक आणि कोल्हापूर येथे कृष्णाघाट मार्गे जाण्यासाठी शास्त्री चौक हा प्रमुख रस्ता आहे. या रस्त्यांची अवस्था पावसाळा असो किंवा उन्हाळा, हिवाळा वर्षानुवर्षे जैसे थे आहे. वाहन धारकांना रोज किमान दिड ते दोन फुटांपर्यंतचे खड्डे चुकवित आणि जीव मुठीत धरुनच हा रस्ता पार करावा लागतो. 

नुकतेच या ठिकाणी महापालिकेकडून खराब रस्त्यांचे मुरमीकरण करण्यात आले. मात्र पावसाच्या पहिल्या जोरदार सरीत मुरुमाचा चिखल झाला. शहरात सध्या रखडलेल्या अमृत योजनांचे काम देखिल एन पावसाळ्यात सुरू असून यामुळे उपनगरातील रस्ते चिखलमय झाले आहे.

अमृत योजनेच्या निकृष्ठ कामांमुळेच शिवाजी रोडवरील मिश्न चौकात दोन वाहने रूतल्याच्या घटना घडल्या यामुळे अमृत योजनेच्या कामातील पारदर्शीपणा दिसला. नुसते चरी पाडणे आणि निकृष्ठ पध्दतीने पुन्हा दुरूस्ती करणे हीच कामे नागरिकांच्या जीवावर बेतताना दिसत आहेत.

तर काही प्रभागात भर पावसात रस्त्यांची कामे करून ठेकेदारांकडून टक्केवारी आणि महापालिकेच्या निधीची लूट सुरू आहे. वर्षभर कामे रेंगाळायची आणि ऐन पावसाळ्यात विकासकामांचा श्री गणेश सुरू करून निधी हाडपायचा असाच उद्योग सुरू असल्याचे प्रभागातील सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे.

शहरात सध्या अऩेक रस्ते हे नियमास अनुसरून करण्यात आले नाहीत. त्यामुळे मुख्य रस्त्यांवर देखिल पाणी साचून रस्त्यांचे नुकसान होत आहे. आदीच मिरज पॅटर्न वाल्यांनी शहरातील विकास कामांच्या नावाने चुकीच्या कामांना पाठिंबा दिला आहे. कारण याच विकास कामात ठेकेदारांकडून मलई मिळते. तर इतर मंजुर केलेली कामे निकृष्ठ दर्जाची सुरू आहेत. 
--------------- 

खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटना 
शास्त्रीचौक ते स्टॅडकडे मार्गावर दिड ते दोन फुटांपर्यंत खड्डे पडल्यामुळे, दुचाकीस्वार आणि अवजड वाहनांचा अपघात होत आहे. तसेच जेष्ठ नागरिकांसह रहिवाशांना यामार्गावरून जाणे म्हणजे तारेवरची कसरत करण्या सारखेच आहे. 

संपादन ः अमोल गुरव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The rain came and ran .. the roads were washed away: see where