कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

 कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. चोवीस तासात १०९ तर काल रात्रभर १९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ​

कऱ्हाड : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. चोवीस तासात १०९ तर काल रात्रभर १९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.  कोयना जलाशयाचा एकुण पाणीसाठा ८७.४५ टीएमसी झाला आहे. पाणीपातळी २१४९.०६ फुट झाली आहे. जलाशयात प्रतिसेकंद  सहा हजार १० हजार ३०५ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. 

चार दिवसांपासुन पावसाचा जोर कमी झाला होता मात्र काल दिवसभर हलक्या स्वरुपाच्या सरींनी तालुकाभर हजेरी लावली. चोवीस तासात कोयनानगरला १९ (३६२६), नवजाला आठ (३६००) व महाबळेश्वरला २३ (३१६५) मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 

Web Title: rain fall become less in koyana dam area