सांगली शहरात पडला अवकाळी पाऊस

images (1).jpg
images (1).jpg

सांगली, : गेले काही दिवस हवेत तीव्र उष्मा वाढला आहे. त्यामुळे उकाडाही जाणवत आहे. सध्या शहरात लॉकडाऊन सुरु असल्यामुळे रस्तेही ओस पडले आहेत. सगळे व्यवहार ठप्प आहेत. त्यातच आज सकाळपासून हवेत चांगलाच उकाडा जाणवत होता. दमट वातावरण झाले होते. त्यामुळे नागरिकही चांगलेच घामाघूम झाले होते.

घरातून बाहेर पडता येत नसल्याने सांगलीकरांची गोची झाली आहे. शिवाय कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी वातानुकुलित यंत्रणाही बंद ठेवावी लागत आहे. अशा परिस्थितीत पाऊस पडला तरच उकाडा कमी होणार अशी शक्‍यता होती.

आज सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने शहरात शिडकावा करत हजेरी लावली. त्यानंतर मध्यम सरींनी हवेतील उष्मा कमी केला. सुमारे अर्धा तास झालेल्या पावसामुळे उकाडा कमी झाला. शहरातील संचारबंदीमुळे आजचा शनिवारचा बाजारही भरलेला नसल्यामुळे एरवी बाजाराच्या वेळी आलेल्या पावसाने उडणारी विक्रेत्यांची धांदल आज पहायला मिळाली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com