सांगलीत कृष्णा नदीने ओलांडली इशारा पातळी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी धोक्याच्या इशारा वर गेले आहे. आयर्विन पुलाजवळ आज सकाळी नऊ वाजता पाणी पातळी 41 फूट होती. रात्रभर शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहरातील उपनगरही पाण्यात गेले आहेत.

सांगली - सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी धोक्याच्या इशारा वर गेले आहे. आयर्विन पुलाजवळ आज सकाळी नऊ वाजता पाणी पातळी 41 फूट होती. रात्रभर शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहरातील उपनगरही पाण्यात गेले आहेत.

कृष्णा नदीची पाणीपातळी सातत्याने वाढत असल्यामुळे रात्रीपासून नदीकाठचा जवळच्या मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट, दत्तनगर, साई कॉलनी, कर्नाल रोड या भागातील परिसर पुन्हा पाण्याखाली गेला आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून काल रात्री एक वाजता मौलाना नगर भागातील कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. तसेच मगरमच्छ कॉलनीतील काही कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

यापूर्वीही चारशेहून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. स्थलांतर करण्यात आलेल्या नागरिकांची सोय महापालिकेच्या शाळा क्रमांक 1 आणि शाळा क्रमांक 25 येथे करण्यात आली आहे.

आज सकाळपासून शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे.  कोयना धरणातून काल पाणी सोडण्यात आले आहे हे पाणी आज संध्याकाळपर्यंत सांगलीत पोहोचणे शकत आहे त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होणार आहे तसेच वारणा धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे कृष्णा नदीकाठावरील गावे आणि वस्त्यांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.

कृष्णा नदीच्या जवळच असलेले विष्णू घाट सरकारी घाट आणि स्वामी समर्थ मंदिराचा माई घाट हे सर्व पाण्याखाली गेले आहेत तसेच अमरधाम स्मशानभूमीत परिसरही पाण्याखाली गेला आहे. या सर्व घाटावर असलेल्या मंदिरांना पाणी लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Krishna River Flood Water Sangli