उंडाळे व येळगाव परिसरालाअवकाळी पावसाने झोडपले 

rain
rain

उंडाळे - आज पहाटे सहा वाजल्यापासून उंडाळे परिसरामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सकाळी ग्रामस्थांची मोठी तारांबळ उडाली़. सकाळी सहाच्या सुमारास परिसरात आकाश ढगांनी भरून आले. ढगांच्या गडगडाटाडाटासह पाऊस सुरू झाला. सुमारे दीड तास पाऊस कोसळत होता. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. अनेकांच्या घरात पाणी शिरले तर नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले. अचानक सुरू झालेल्या या मुसळधार पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

या पावसामुळे उस तोडणीला फटका बसला असून, परिसरात रयत, क्रूष्णा, जयवंत शुगर, विश्वास आदी कारखाने कार्यरत आहेत. मात्र आता दोन दिवस तरी ऊस तोडणी करता येणार नाही त्यामुळे याचा फटका कारखान्यांना बसणार आहे. रब्बी हंगामात पेरणी केलेल्या पिकांना हा पाऊस उपयुक्त आहे. मात्र पेरणीच्या तयारीत असणाऱ्या शेतकर्यांच्या कामाचा खोळंबा झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com