सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सुरु

सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सुरु

सातारा- सातारा जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसास आज (मंगळवार) सकाळपासून प्रारंभ झाला. जिल्ह्यातील खंडाळा, कोरेगाव, दहिवडी, फलटण या दुष्काळी भागात ही पाऊस सुरु असल्याने रब्बी पिकांना उपयुक्त असल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे.

दरम्यान पावसामुळे ऊस तोडणीत व्यतत्य आला असून साखर कारखान्यांच्या गाळपावर परिणाम होईल अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. सातारा जिल्ह्यातील विविध भागात आज (मंगळवार) पहाटेपासून पावसास प्रारंभ झाला. यामध्ये वर्णे, अंगापूर, लोणंद, रहिमतपूर, कोंडवे, पुसेसावळी, भुईज, पाचवड आदी भागात दमदार पाऊस झाला. रब्बीतील ज्वारी, कांदा, हरबरा पिकांना पाऊस उपयुक्त शेतकरी वर्ग काहीसा सुखावला आहे. वाईच्या पूर्व भागातील वेळे, कवठे, सुरूर, अनवडी शिरगाव, देगाव किकली, खोलवडी राऊतवाडी, गोवेदिगर, लगडवाडी, मापारवाडी, वाखणवाडी, बेलमाची आदी गावच्या शिवारातील शेतीला उपयुक्त ठरणार आहे.

आनेवाडी रायगाव, मर्ढे, सायगाव, रायगाव महामुल्करवाड़ी, मोरघर महिगाव, दुदुस्करवादी, पवारवाड़ी येथील शेतकऱ्यांची गहु, ज्वारी, भुइमुंग अशी रब्बी पिके करणाऱ्या शेतकरी वर्गाला दिलासा दिला तर बागायती भाजीपाला करणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागणार आहे. सातारा शहर व परिसरात संततधार पाऊस सुरु आहे. यामुळे बाजारपेठेत नागरीकांची धांदल उडाली. मुख्य बसस्थानक, राजवाडा, मोती चौक, शाहू चौक परिसरात काही भागात रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com