राजापुरी हळदीला 25 हजार रुपये उच्चांकी दर

Rajapuri turmeric has a high price of Rs 25,000
Rajapuri turmeric has a high price of Rs 25,000

सांगली : येथील कृषि उत्पन्न बाजार समितीतर्फे काढण्यात येणाऱ्या हळदीच्या सौद्यात गेल्या आठवड्यापासून दरात वाढ होत आहे. आज तर राजापुरी हळदीला उच्चांकी 25 हजार रुपये क्विंटल दर मिळाला. हा आजपर्यंतचा हळदीचा ऐतिहासिक उच्चांकी दर असल्याचे स्पष्ट झाले. 

आज मेसर्स एन. बी. पाटील या दुकानामधील हळद सौद्यामध्ये बेडग (ता. मिरज) येथील शेतकरी आण्णासो ओमासे यांच्या राजापूरी हळदीला प्रति क्विंटल 25 हजार रुपये इतका जास्तीत जास्त दर मिळाला. ही हळद मेसर्स मनाली ट्रेंडिंग कंपनी यांनी खरेदी केलेली आहे. 25 हजार रुपये प्रति क्विंटल हा आजपर्यंत सर्वात जास्त म्हणजे उच्चांकी दर ठरला आहे.

तसेच आज झालेल्या हळद सौद्यात प्रति क्विंटल कमीत कमी 7 हजार 500 रुपये व जास्तीत जास्त 25 हजार रुपये दर झाला. तर सरासरी 16 हजार 250 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. सौद्यासाठी आडते, व्यापारी, खरेदीदार, हमाल, तोलाईदार व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

दरम्यान हळद सौद्यामध्ये दरात गेल्या आठवड्यापासून वाढ होत चालल्याचे दिसून येते. 16 फेब्रुवारीच्या सौद्या 17 हजार 100 रुपये, 23 फेब्रुवारीच्या सौद्यात 21 हजार रुपये, 24 रोजीच्या सौद्यात 24 हजार 100 रुपये आणि आजच्या सौद्यात विक्रमी 25 हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. सलग तीन दिवसांत दरवाढीची "हॅटट्रिक' झाली आहे. कोट 
हळदीला विक्रमी उच्चांकी दर मिळत असल्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त हळद विक्रीसाठी आणावी. तसेच शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा. 
- दिनकर पाटील, सभापती व एम. पी चव्हाण सचिव, बाजार समिती 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com