राजारामबापू दुधसंघास राज्यशासनाचा सहकार भूषण पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

इस्लामपूर -  राजाराम बापू पाटील सहकारी दूध संघास राज्य शासनाच्या वतीने सहकार भुषण पुरस्कार घोषित झाला असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. गेल्या वर्षी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डकडून पश्‍चिम भारतामध्ये प्रथम डेअरी एक्स्लंट अ‍ॅवॉर्ड व दुग्धपदार्थाच्या गुणवत्तेकामी क्वॉलिटी मार्क हे दोन अ‍ॅवॉर्ड दूध संघास प्राप्त झाले आहेत. आता राज्य शासनाच्या सहकार भुषण पुरस्काराने दुध संघाला गौरवण्यात येणार आहे.

ते म्हणाले, ‘‘ राज्याच्या सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करीत असलेल्या सहकारी संस्थांना राज्य शासनामार्फर सहकार महर्षि, सहकार भुषण व सहकारनिष्ठ हे पुरस्कार रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह प्रदान करुन समारंभपुर्वक देत त्या संस्थांचा गौरव करण्यात येतो. सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या समीतीच्या मान्यतनेनुसार 2016-17 वर्षासाठी राजारामबापू दूध संघास सहकार भुषण पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या बाबतचा शासन निर्णय दूध संघास प्राप्त झाला आहे. संघाने गेल्या दहा वर्षात दूध उत्पादकांसाठी केलेली कामे, शासनाच्या योजनांमध्ये सहभाग, संघाची एकुण कामकाजाची पध्दत असे विविध निकष पुरस्कारासाठी लावण्यात आले होते. या सर्व निकषामध्ये राजारामबापू दूध संघ उत्कृष्ट ठरला व त्याला सहकारभुषण पुरस्कार घोषित झाला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली संघाची वाटचाल सुरु आहे.’’ 

पत्रकार बैठकीस उपाध्यक्ष जगन्नाथ पाटील, संचालक बाळासाहेब पाटील, कार्यकारी संचालक बी. बी. भंडारी उपस्थित होते.

Web Title: Rajarambapu Dudh Sangh's sahakar Bhushan Award