
मोहोळ : मोहोळ विधानसभेची विजयश्री खेचून आणताच आता आमदार राजू खरे यांनी "मिशन मोहोळ नगर परिषदेची" घोषणा केली असून, शिवशक्ती व भीमशक्ती एकत्र करून मोहोळ नगरपरिषद जिंकायचीच असा चंग त्यांनी बांधला आहे. दरम्यान आमदार खरे यांनी सुरुवातच थेट शेतकऱ्यांच्या कामा पासून केली आहे. जामगाव येथील एका शेतकऱ्याच्या वीज कनेक्शन बाबत कार्यकारी अभियंता रमेश राठोड यांच्याशी चर्चा करून त्यावर तोडगा काढण्याची सुचना दिली. पुळुज येथील शेतकरी धनंजय देशमुख यांच्या द्राक्ष बागेला भेट देऊन अडचणीची माहिती घेतली. त्यामुळे आमदार खरे हे ॲक्शन मोडवर आले आहेत.