सांगली : उसाच्या गाळप हंगामात उसाचे उत्पन्न घटले असताना साखर उताराही घटल्याचे आकडेवारीवरून दिसते आहे. ऊस घटतो, तेव्हा उतारा वाढतो, मात्र सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी तयार झालेली साखर हिशेबात धरली नसून उतारा चोरल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.