‘‘कोल्हापूर व सांगलीमध्ये हा महामार्ग झाला तर भरावामुळे महापुराचा प्रश्न आणखी गंभीर होणार आहे. ‘रत्नागिरी-नागपूर’ हा महामार्ग दळणवळणासाठी पुरेसा आहे. तो असतानादेखील नवीन महामार्गाचा घाट केवळ भ्रष्टाचारासाठी आहे."
कोल्हापूर : ‘‘शक्तिपीठ महामार्ग (Shaktipeeth Highway) तयार करण्यासाठी जास्तीतजास्त ३५ हजार कोटी खर्च येऊ शकतो; परंतु याचा खर्च ८५ हजार कोटींवर नेला आहे. यातील ५० हजार कोटी महायुती सरकारमधील दलाल नेत्यांसाठी ठेवले जातील. त्यामुळे हा महामार्ग म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे,’’ असा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी येथे केला.