'उद्या तोडगा निघाला नाही तर एकही वाहन रस्त्यावर फिरू देणार नाही'; सांगलीतील कारखानदारांना राजू शेट्टींचा इशारा

सांगली जिल्ह्यात दराबाबत कारखानदारांची (Sugar Factory) रविवारी (ता. २६) बैठक आहे.
Raju Shetti
Raju Shettiesakal
Summary

पोरं एकमेकांच्या उरावर बसायला लागली तर पालकाची जबाबदारी आहे की नाही मध्यस्थी करायची.

सांगली : ‘‘गत वर्षीच्या हंगामात तीन हजारांहून अधिक मागितले. ज्या कारखान्यांनी ३ हजारांच्या आत दिले, त्यांनी १०० रुपये; तर ३ हजारांहून अधिक दर दिला आहे, त्या कारखान्यांनी प्रतिटन ५० रुपये द्यावेत. चालू हंगामात जाणाऱ्या उसाला एफआरपी अधिक शंभर रुपये देण्याचा तोडगा कोल्हापूर जिल्ह्यात निघाला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा हाच फॉर्म्युला सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी स्वीकारावा,’’ अशी मागणी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.

Raju Shetti
मोठी बातमी! ..अखेर ऊसदराची कोंडी फुटली, राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन मागे; 'इतक्या' रुपयांवर निघाला तोडगा

सांगली जिल्ह्यात दराबाबत कारखानदारांची (Sugar Factory) रविवारी (ता. २६) बैठक आहे. त्यात निर्णय न झाल्यास एक वाहनही फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. कोल्हापुरात (Kolhapur) आंदोलन यशस्वी झाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादकांच्या प्रश्नांबाबत शेट्टी यांनी भूमिका मांडली. या वेळी महेश खराडे, संदीप राजोबा उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, ‘‘सांगलीतील बैठकीत रविवारी निर्णय झाला तर चांगले आहे; अन्यथा दोन्ही जिल्ह्यांतील ऊस उत्पादक आंदोलन करतील. या वर्षीची उचल विनाकपात घेणार आहे. कोणी कितीही मोठा नेता असला तरी आम्ही त्याच्या कारखान्यावर आंदोलन करून रक्कम वसूल करू. आता आम्ही मागे हटणार नाही.

Raju Shetti
मोठी बातमी! 'स्वाभिमानी'ला महामार्गावर 'चक्काजाम' करणं भोवलं; राजू शेट्टींसह अडीच हजार शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल

रविवारच्या बैठकीत निर्णय घ्या; अन्यथा आंदोलनाची सुरवात साखराळे येथील राजारामबापू कारखान्यावरून करू, त्यानंतर क्रांती आणि सोनहिरा कारखान्यांवर मोर्चा असेल. कोणत्याही कारखान्याला सुटी देणार नाही. शनिवारी (ता. २५) राजारामबापू कारखान्यावर होणारे आंदोलन निर्णय होईपर्यंत स्थगित केले आहे.’’

‘पालकमंत्र्यांनी तोडगा काढावा’

‘‘रविवारी तोडगा निघाला नाही तर रस्त्यावर एकही वाहन फिरू देणार नाही. पोलिसांनी कायदा- सुव्यवस्थेच्या नावाखाली मध्ये येऊ नये. पालकमंत्र्यांनी तोडगा काढावा. पोरं एकमेकांच्या उरावर बसायला लागली तर पालकाची जबाबदारी आहे की नाही मध्यस्थी करायची,’’ असा सवालही शेट्टी यांनी पालकमंत्री खाडेंचे नाव न घेता केला.

Raju Shetti
Sangli Politics : जयंत पाटलांच्या गडाला धक्के देण्याचे अजितदादा गटाचे मनसुबे; 'या' नव्या शिलेदारांची लागणार कसोटी

लुंग्या-सुंग्याच्या सर्टिफिकेटची गरज नाही...

‘‘माझ्या एका हाकेवर हजारो लोक रस्त्यावर उतरतात, हेच माझे सर्टिफिकेट आहे. कुण्या लुंग्या-सुंग्याच्या सर्टिफिकेटची आवश्‍यकता नाही. सदाभाऊ काय म्हणतोय त्यावर उत्तर द्यायला, मी आलो नाही. माझे कार्यकर्ते त्याला उत्तर देतील. माझे कार्यकर्ते त्याच्यापेक्षा मोठे आहेत,’’ असा टोला शेट्टी यांनी लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com