'महाआघाडीत वंचित आघाडी आणि मनसेला सोबत घेण्यासाठी प्रयत्न'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना विरोधात महाआघाडी निर्माण करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुढाकार घेतला आहे. येत्या 19 सप्टेंबरला यासाठी मुंबईमध्ये राज्यातील सर्व छोट्या-मोठ्या पक्षांचे बैठक बोलवण्यात आली आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना विरोधात व्यापक महाआघाडी करण्यासाठी 19 सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये छोट्या-मोठ्या पक्षांची बैठक पार पडणार असून, यानंतर कॉग्रेस-राष्ट्रवादीकडे एकत्रित जागेची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे.

तसेच वंचित आघाडी आणि मनसेला सोबत घेण्यासाठी आपण प्रयत्नशील असून दोघांनीही महाआघाडीत यावे, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना विरोधात महाआघाडी निर्माण करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुढाकार घेतला आहे. येत्या 19 सप्टेंबरला यासाठी मुंबईमध्ये राज्यातील सर्व छोट्या-मोठ्या पक्षांचे बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकरी कामगार पक्ष प्रहार संघटना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी डाव्या संघटना अशा सर्व छोट्या- मोठ्या संघटना ,पक्ष्यांची मोठ बांधण्यात येणार आहे आणि या बैठकीमधून काँग्रेस-राष्ट्रवादीकडे एकत्रित जागेची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती शेट्टींनी दिली आहे.

प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू, शेकापचे नेते जयंत पाटील, सीपीएम नेते प्रकाश रेड्डी यांच्यासह डाव्या संघटनांच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडणार आहे आणि यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीकडे किती जागा मागायच्या यावर निर्णय होणार आहे अशी माहिती शेट्टी यांनी दिली आहे. त्याबरोबर भाजप-सेना विरोधातील यामहा गाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि मनसे यांचाही समावेश व्हावा,यासाठी आपण प्रयत्नशील असून सर्वांच्या सोबत बोलणं सुरू आहे आणि या दोन्ही पक्षांनीही काँग्रेस-राष्ट्रवादी सोबतच्या गाडीमध्ये यावर असे आवाहन केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raju Shetty statement on Vanchit Bahujan Aghadi and MNS