भाजपच्या डावपेचांना भीक घालणार नाही - राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

सांगली - शेतकरी कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर राज्यात आत्मक्‍लेश पदयात्रेचे वातावरण तापलेले असताना त्याला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न काही मंडळी करीत आहेत, अशा खेळ्या करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद कमी होणार नाही. भाजपच्या डावपेचांना मी भीक घालणार नाही, अशा शब्दांत खासदार राजू शेट्टी यांनी भूमिका स्पष्ट केली. 

पुण्यातून उद्या (ता. 22) सुरू होत असलेल्या आत्मक्‍लेश पदयात्रेच्या पार्श्‍वभूमीवर स्वाभिमानीचे बडे नेते, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा पुढे आली. त्याविषयी त्यांनी "सकाळ'कडे भूमिका मांडली. सदाभाऊंच्या भाजपप्रवेशाबाबत, ""मी या मुद्द्यावर निरुत्तर नाही; मात्र वेळ आली की मी उत्तर देईन,'' असे सांगत त्यांनी भाजपवर हल्ला चढवला. ते म्हणाले, ""सरकार कितीही ताकदवान असले तरी जनमताचा आवाज दाबू शकत नाही, हे आम्ही लोकसभेत जमीन अधिग्रहणाच्या विधेयकावर दाखवून दिले. केंद्रात भाजपला पूर्ण बहुमत असताना जनमतासमोर झुकावे लागले. राज्यातून तेवढाच जनरेटा उभा करतोय. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करण्यासाठी हा लढा आहे. समाजातील विचारवंत, बुद्धिवादी, कलावंत, डॉक्‍टर अशा लोकांना सोबत घेतोय. ते शेतकऱ्यांच्या पाठीशी असतील तर सरकारवर अधिक नैतिक दबाव असेल. एक दिवस आमच्यासोबत चाला, शेतकऱ्यांची दुखणी समजून घ्या, असे आवाहन आम्ही त्यांना केलंय. प्रतिसाद तुफान आहे.''

Web Title: Raju Shetty will not begging BJP tactics