प्राण्यांच्या अवयवांची तस्करी; पाच जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

राजूर - जंगली प्राण्यांची हत्या करून त्यांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीस इगतपुरी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. इगतपुरी वन विभागाचे वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांना खेड, मांजरगाव भागातील डोंगरात बिबट्याची कातडी, नखे, मिशा विकणारी टोळी फिरत असल्याची माहिती मिळाली. याबाबत जाधव यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे व वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानुसार जाधव यांनी बनावट ग्राहक बनून बिबट्याच्या अवयवांची किंमत सहा लाख ठरविली. बिबट्याला मारून त्याच्या अवयवांची विक्री होत असल्याची खात्री झाल्यानंतर आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांवरून ताब्यात घेतले.
Web Title: rajur news animal body part smuggling crime