राजवडी - कळाशी रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे

राजकुमार थोरात
सोमवार, 28 मे 2018

वालचंदनगर -  इंदापूर तालुक्यातील राजवडी ते कळाशी रस्त्याचे काम पूर्णत्तवाकडे असुन, या रस्त्याचा सहा गावातील नागरिकांना फायदा होणार आहे. याबाबत पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी माहिती दिली.

वालचंदनगर -  इंदापूर तालुक्यातील राजवडी ते कळाशी रस्त्याचे काम पूर्णत्तवाकडे असुन, या रस्त्याचा सहा गावातील नागरिकांना फायदा होणार आहे. याबाबत पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी माहिती दिली.

पळसदेव-बिजवडी जिल्हा परिषदेच्या गटातील राजवडी ते कळाशी या तीन कि.मी रस्त्यासाठी गेल्या वर्षी जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण होत असून, साईडपट्या भरण्याचे काम सुरु आहे. या रस्त्यामुळे कळाशी, गंगावळण, करेवाडी, कालठण, वरकुटे या गावातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोलाची मदत होणार आहे. तसेच या रस्त्यामुळे अनेक गावे जोडली जाणार आहेत. आज (रविवार) पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी रस्त्याच्या कामाची अचानक पाहणी केली. यावेळी बांधकाम समितीचे सदस्य दिलीप घुले, निलेश घुले, गजानन घुले, दत्तात्रेय उंद्रे उपस्थित होते.

सभापती मानेंचे ग्रामस्थांनी मानले आभार
गेल्या वर्षी राजवडी ते कळाशी या दुरावस्था झाली होती. खड्यामध्ये रस्ता की,रस्ते खड्डे अशी परस्थिती होती. या रस्त्याने नागरिकांना प्रवास करणे जिकरीचे झाले होते. झेडपीच्या फंडातुन या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे नागरिक व प्रवाशी समाधानी असून, पाच गावातील नागरिकांनी झेडपीचे सभापती माने यांचे आभार मानले.

Web Title: Rajwadi - kelashi Completion of road work