#Rakshabandhan : वाघा बॉर्डवरील जवानांचे हात केले बळकट

संजय आ.काटे
रविवार, 26 ऑगस्ट 2018

श्रीगोंदे (नगर) : थेट वाघा बॉर्डवर जावून देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांना राखी बांधत शिरुर व श्रीगोंदेतील महिलांनी अनोखे रक्षाबंधन साजरे केले. दोन हजार राख्या, शुभेच्छापत्रे व मानचिन्ह घेवून जात देशाचे रक्षण करणाऱ्यांचे हात राखीविना राहू नयेत ही अपेक्षा ठेवून हा उपक्रम केल्याचे यशस्विनी वेल्फेअर फाउंडेशनच्या अध्यक्षा दिपाली शेळके अभिमानाने सांगत होत्या. 

शिरुर तालुक्यातील यशस्विनी वेल्फेअरच्या महिलांनी हा उपक्रम राबविला. यात शेळके यांच्यासह काष्टी येथील सुरेखा आढाव, प्रमिला आढाव, सुरेखा आढाव, लक्ष्मी फडतरे, सारीका शिंदे, वैशाली थिंटे, आरती पवार, वनिता आढाव, स्नेहा पवार, प्राजक्ता शिंदे, राजाराम गायकवाड उपस्थितीत होते. 

शेळके म्हणाल्या, हा उपक्रम राबविण्यासाठी आम्ही केंद्रीय गृहखात्याची मंजूरी घेतील. सीमेवर लढणाऱ्या जवानांमुळे आपण सगळे सुरक्षीत आहोत. त्यांचे हात राखीविनाच राहतात. त्यामुळे आम्ही तेथे जावून रक्षाबंधन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शिरुर तालुक्यातील पंधरा शाळांतील विद्यार्थ्यांनी शुभेच्छा पत्रे तयार केली होती. दोन हजार राख्या, शुभेच्छापत्रे व मानचिन्हे दिल्यानंतर जवानांच्या डोळ्यातील बहिणेची माया अनुभली. तेथे महाराष्ट्रातील काही जवान भेटले त्यांनी इतरांना आमचा उपक्रम समाजावून सांगितला. 

खास मराठी पेहरावात बहिणींनी ओवाळले जवानांना

नऊवारी काठपदरी साडी, हातात ओवाळणीचे ताट घेवून जवानांना या महिलांनी औक्षण करुन ओवाळल्याने तेथील वातावरण वेगळेच बनल्याचे सुरेखा आढाव म्हणाल्या.

Web Title: #Rakshabandhan celebrate on Wagha border