हजारे उपोषणासाठी दिल्लीकडे रवाना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

राळेगणसिद्धी - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आपल्या विविध मागण्यांसाठी 23 मार्चपासून दिल्ली येथे रामलीला मैदानावर आंदोलन करत आहेत. आज सकाळी हजारे यांनी यादवबाबा मंदिर तसेच पिंपळनेर येथे निळोबा महाराजांचे व गावातील पद्मावती मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

त्यानंतर यादवबाबा मंदिर मैदानात ग्रामस्थ, राळेगणसिद्धी परिवार, तसेच परिसराच्या वतीने भावूक वातावरणात व घोषणांच्या जयजयकारात 10 वाजण्याच्या सुमारास निरोप देण्यात आला. या वेळी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादनखर्चाच्या दीडपट बाजारभाव मिळावा, वयोवृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी, लोकपाल व लोकायुक्तची अंमलबजावणी करावी, तसेच निवडणूक कायद्यात सुधारणा करावी या आणि इतर मागण्यांसाठी हजारे बेमुदत उपोषण करत आहेत.

Web Title: ralegansiddhi news anna hazare fasting delhi