राळेगणसिद्धीचा मिडीया आता सचित्र पुस्तकरूपाने घराघरात पोहोचणार

मार्तंड बुचुडे
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

राळेगणसिद्धी गावाचा ख्याती व नांव विकासाची पंढरी म्हणून राज्यातच नव्हे तर देशभरात गाजले आहे. ज्याप्रमाणे दरवर्षी लाखो भाविक पंढरपूरला येतात त्याच प्रमाणे येथेही लाखो पर्यटक येऊन गावाने केलेला प्रगतीचा इतिहास लेखी नोंदी करून, डोळ्यात भरून तर काही मनात साठवून नेत आहेत.

राळेगणसिद्धी : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ऊभारलेला गावच्या विकासाचा इतिहास मिडीया सेंटर अता थेट सचित्र पुस्तक रूपाने पर्यटकांच्या हाती मिळणर आहे. लवकरच राळेगणसिद्धीची ही या सचित्र कहाणी व केलेल्या कामांचाव विकासाचा तपशील या पुस्तकात असणार आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना या गावाच्या विकासाचा खजिणा अता आपल्या बरोबरही घेऊन जाता येार आहे. जे आपल्याबरोबर आले नाहीत त्यांनाही अता घरी बसून ही माहिती पुस्तक रूपाने मिळणार आहे.

राळेगणसिद्धी गावाचा ख्याती व नांव विकासाची पंढरी म्हणून राज्यातच नव्हे तर देशभरात गाजले आहे. ज्याप्रमाणे दरवर्षी लाखो भाविक पंढरपूरला येतात. त्याचप्रमाणे येथेही लाखो पर्यटक येऊन गावाने केलेला प्रगतीचा इतिहास लेखी नोंदी करून, डोळ्यात भरून तर काही मनात साठवून नेत आहेत. मात्र ही मंडळी गावी गेल्यानंतर पाहीलेल्या सर्वच बाबी सांगणे कठीण जाते. तसेच आपल्या गावातही तसा विकास करावयाचा ठरविला तर अडचणी येतात. त्याचबरोबर जे येथे येऊ शकत नाहीत त्यांनाही हा गाव पहाण्याची खंत मनात कायम सलत राहते. अता मात्र ही खंत कमी होणार आहे. लवकरच संपुर्ण गावाच्या विकासाच्या प्रगतीचे सचित्र पुस्तक तयार होत असून ते पर्यटकांच्या हाती मिळणार आहे. त्यामुळे जगभरातील लोकांना राळेगणसिद्धीचा सचित्र असा इतिहास पहावयास व वाचावयास मिळणार आहे व तो ठेवा कायम आपल्या संग्रही ठेवता येणार आहे. 

आम्ही केलेल्या विविध प्रयोगांचे फलीत झाले आहे. ते देशात राबविले जात आहेत. त्यात पाणी आडवा पाणी जिरवा ज्यामुळे गावातील पाणी पातळी वाढली, शेतीचा विकास झाला, जोडधंदे वाढले, दुध धंदा, बंदीस्त शेळी पालन, कुकुटपालन असे व्यसाय करून गावाची कायापालट झाला तो कसा झाला ते प्रेतकाला येथे येऊन पहाता येत नाही किंवा हा माहितीचा साठा बरोबर नेता येत नाही ही खंत अनेक दिवस मनात होती म्हणून मी ते पुस्तक रूपाने लोकांच्या हाती देत आहे. - अण्णा हजारे, जेष्ठ समाजसेवक

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

    

Web Title: Ralegansiddhis media will now reach everyones home in an illustrated book