सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मोर्चा, निवृत्तीवेतन वाढीसह विविध मागण्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

भिंगार (नगर) : ईपीएफ 95 च्या सेवानिवृत्ती वेतनात दर तीन वर्षांनी सुधारणा करणे अपेक्षित आहे,मात्र अजूनही वेतनवाढ झालेली नाही. विरोधात असताना प्रकाश जावडेकर यांनी निवृत्ती वेतन वाढ देण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र सत्तेवर आल्यावर त्यांना या मागणीचा विसर पडला. त्यामुळे येत्या सात ऑगस्टला दिल्ली येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. मागणी मान्य न झाल्यास भाजपा सरकार विरोधात मतदान केले जाईल,असा इशारा आनंदराव वायकर यांनी दिला. 

निवृत्तीवेतन वाढीसह सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ, महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना, राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना व ईपीएस 95 समन्वय समितीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हाव्यापी मोर्चा काढण्यात आला. या वेळी वायकर बोलत होते. 

या मोर्चाचे नेतृत्व सुभाष कुलकर्णी, रमेश गवळी, गोरख कापसे यांनी केले. विष्णुपंत टकले, शरद नेहे आदीसह सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. 

जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की निवृत्त कर्मचाऱ्याना दरमहा नऊ हजार निवृत्तीवेतनासह केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, सर्व सेवानिवृत्तांना दर्जेदार व मोफत वैद्यकिय सुविधा उपलब्ध करावी, अन्नसुरक्षा कायदा लागू करावा, 1995 च्या पेन्शन कायद्यात दुरुस्त्या कराव्यात 

तर धडा शिकवू ! 
राज्यात 12 लाख व देशात 60 लाख निवृत्तवेतन धारक आहेत. ही ताकद केंद्र सरकारने लक्षात घ्यावी. आता वेगवेगळी चर्चा होणार नाही. होशियारी समितीची अंमलबजावणी ऑगस्टच्या करा अन्यथा केंद्रातील सत्ताधाऱ्यांना धडा शिकवू, असे इशारा रमेश गवळी यांनी दिला.

Web Title: rally of pensioners demand for increase pension