शासनाला जाग आणण्यासाठी मोर्चा काढला - नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

राहुरी फॅक्टरी (नगर) : "शासन व लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात. म्हणून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी व शासनाला जाग आणण्यासाठी मोर्चा काढला." असे राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

राहुरी फॅक्टरी (नगर) : "शासन व लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात. म्हणून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी व शासनाला जाग आणण्यासाठी मोर्चा काढला." असे राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर राहुरी तहसील कार्यालयावर आयोजित मोर्चात तनपुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते होते. युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, सुरेश वाबळे, अजित कदम, बाबासाहेब भिटे, धीरज पानसंबळ, विजय कातोरे, धनंजय म्हसे, सभापती मनिषा ओहोळ, किशोर जाधव, अनिल इंगळे उपस्थित होते. राहुरी बाजार समिती पासून नवी पेठ, शनि चौक मार्गे मोर्चात हजारो शेतकरी घोषणा देत सामिल झाले.

तनपुरेे पुढे म्हणाले, "दूधवाल्यांचा प्रतिनिधी म्हणविणारे आमदार विधानसभेत बोलत नाहीत. म्हणून रस्त्यावर उतरलो. कर्जमाफी एक वर्षा पासून प्रलंबित आहे. बोंडअळी नुकसानीची ७५ टक्के रक्कम मिळाली नाही. दूधाचे दर कोसळले. तालुक्यात विजेचा खेळ खंडोबा झाला. शासनाला जाग येत नाही."

संग्राम कोते म्हणाले, "गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची शासनाला जाण नाही. प्राजक्त तनपुरेे यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्र यावे." 'स्वाभिमानी' चे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, प्रकाश देठे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे, आप्पासाहेब जाधव, नवाज देशमुख, नानासाहेब कदम, शिवाजी सागर यांची भाषणे झाली. रवींद्र आढाव यांनी आभार मानले. तहसीलदार अनिल दोंडे यांनी निवेदन स्विकारले.

Web Title: rally is for wake up government said nagaradhyaksh prajakt tanpure