नगर - जामखेड पोलिस ठाण्यावर महिलांचा मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

जामखेड : "साहेब, आम्ही घराच्या बाहेर कधी पडलो नाही. आमच्या लेकरांची भर बाजारात निर्घृण हत्या होते आणि आरोपी मोकाट फिरत आहेत. आरोपीला अटक केल्याशिवाय आम्ही अंत्यसंस्कार करीत नव्हतो. साहेब, तुम्हीच सांगितले होते लगेच आरोपी अटक करतोत, आता पोलिस नेमके काय करतायत. आमची पोर निरापराध होती, त्यांनी कधी कोणावर अन्याय केला नाही. तुम्ही आम्हाला न्याय द्या. आरोपीला व सूत्रधाराला अटक करा, फाशीची शिक्षा द्या, आरोपी चालवित असलेली तालीम तात्काळ बंद करा,'' अशी विनवणी राळेभात कुटुंबातील महिलांनी पोलिसांकडे केली. तसेच आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत जामखेड बंद कायम राहिल, असा इशाराही दिला. 

सोमवारी (ता. 3) योगेश व राकेश राळेभात या दोघांच्या अंत्यसंस्कारानंतर दुसऱ्या दिवसाचा सोपस्कर विधी पार पडल्यानंतर संतप्त झालेल्या राळेभात कुटुंबातील महिलांनी आपला मोर्चा जामखेड पोलिस ठाण्यावर नेला. यामध्ये मीनाताई राळेभात, शोभा राळेभात, सुनिता राळेभात, मनिषा राळेभात, रजनी राळेभात, प्रांजली राळेभात, मालन राळेभात यांच्यासह राळेभात कुटुंबातील महिला उपस्थितीत होत्या. यावेळी महिलांचा संताप अनावर झाला होता. सर्वांनीच पोलिसांवर प्रश्नांचा भडीमार केला.दोन दिवसात आरोपीला पकडा अन्यथा पुन्हा पोलिस ठाण्यावर मोर्चा आणू. या हत्याकांडातील सूत्रधाराला अटक करा.

उल्हास माने चालवित असलेली तालीम कायमची बंद करा. येथून गुन्हेगारीचे शिक्षण दिले जाते. त्यांच्याकडे पिस्तुल आले कोठून? याची चौकशी करून पुरवठा करणाऱ्या व त्यांची पाठराखण करणाऱ्या सूत्रधाराला अटक करा. निराधार बालकाला, दुर्दैवाने वैधव्य आलेल्या पत्नीला, वयोवृद्ध आईला न्याय द्या साहेब ! आम्ही पाटलांच्या घरातील महिला, कधी रस्त्यावर आलो नाहीत. मात्र आमच्या पोरांची दिवसा-ढवळ्या बाजार दिवशी हत्या होते. दहशत निर्माण करुन आरोपी पसार होतात आणि पोलिस काहीच करीत नाहीत. 

महिलांच्या प्रश्नांचा बडीमार तब्बल तासभर सुरु होता मात्र हतबल झालेले पोलिस शांत होते. अखेर पोलिस निरीक्षक पांडूरंग पवार यांनी आंदोलकांची समजूत घातली. कायद्याच्या चौकटीत राहून आरोपींना अटक करुन कडक शासन करु, विनापरवाना सुरु असलेल्या तालमी बंद करु. सर्व मागण्यांची दखल घेऊन कार्यवाही होईल, असे सांगितले. त्यानंतर दोन दिवसाची मुदत देऊन आंदोलन थांबले. 

"हातात दांडके घेऊन रस्त्यावर उतरू' 
"आमचा कायद्यावर विश्वास आहे म्हणून तुम्हाला न्याय मागत आहोत. आरोपीला अटक होई पर्यंत जामखेड बंद ची हाक कायम राहील. दोन दिवसात आरोपीला अटक केली नाही तर बुधवारी सकाळी पुन्हा आम्ही पोलिस ठाण्यावर मोर्चा काढू. आम्हाला न्याय द्या अन्यथा आम्ही हातत दांडके घेऊन रस्त्यावर उतरु.'' असा इशार संतप्त महिलांनी यावेळी दिला. 

Web Title: rally of women on jamkhed police station