
सांगली : ‘‘राज्यात महिला अत्याचारांच्या घटना वाढत असून त्या रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कठोर पावले उचलावीत. भयमुक्त महाराष्ट्र निर्माण झाला पाहिजे,’’ अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली. आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावरून सुरू असलेल्या वादावरून आठवले यांनी महाराष्ट्र-कर्नाटक म्हणजे भारत-पाकिस्तान आहेत काय, असा प्रश्न करून धरणाची उंची वाढवण्यास विरोध असल्याचेही स्पष्ट केले. आठवले आज सांगली दौऱ्यावर होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.