रामदास आठवले म्हणाले, संत साहित्यातून समतेचा विचार...

Ramdas Athawale said The idea of ​​equality in saint literature kolhapur marathi news
Ramdas Athawale said The idea of ​​equality in saint literature kolhapur marathi news


कोल्हापूर - वारकरी सांप्रदायाने दिलेला एकता आणि समतेचा विचार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर जपला. प्रत्येकाचे आयुष्य आनंदी आणि सुखकर होण्यासाठी हाच विचार महत्वाचा आहे आणि त्याचा जागर संत साहित्य संमेलनातून होत असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. वारकरी साहित्य परिषदेतर्फे येथील गांधी मैदानावर आयोजित आठव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. 

अन्यायाविरोधात वाचा फोडण्यासाठी संतांची भूमिका महत्वाची 

मंत्री श्री. आठवले म्हणाले, ‘‘संत आणि वारकऱ्यांनी समाजातील जातीव्यवस्था, विषमता मिटविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. आजही या विचारांचा प्रभाव कायम असून डॉ. आंबेडकर यांच्यासह राजर्षी शाहू महाराज यांनीही हाच विचार पुढे नेला.’’ 
संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे म्हणाले, ‘‘समाजातील अन्यायाविरोधात वाचा फोडण्यासाठी संतांची भूमिका महत्वाची ठरली. त्यामुळेच एकोणीसाव्या आणि वीसाव्या शतकात अनेक समाजसुधारक तयार झाले.’’
आमदार विनय कोरे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्‌टी यांनीही मनोगते व्यक्त केली. पैठण येथे संतपीठ सुरू करणे, स्वतंत्र देवस्थान मंत्रालय असावे, वारकरी शिक्षण संस्थांना मानधन मंजूर करून देणे, वारकरी शिक्षण संस्थेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सुविधा, अभ्यासक्रमात संत साहित्याचा समावेश करणे, आदी ठराव यावेळी मंजूर झाले. 

उत्कृष्ट महिला कीर्तनकार बीडच्या उषा कांबळे यांचा गौरव

वारकरी सांप्रदायाच्या विशेष सेवेसाठी डॉ. सदानंद मोरे यांना जीवनगौरव, तात्यासाहेब कोरे यांना मरणोत्तर वारकरी विठठल पुरस्कार, उत्कृष्ट महिला कीर्तनकार म्हणून बीडच्या उषा कांबळे यांना गौरविण्यात आले. वारकरी सांप्रदायाच्या विशेष सेवेबद्‌दल बाळासाहेबमहाराज चोपदार यांना चारचाकी गाडी प्रदान करण्यात आली. प्रा. मीरा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्‌ठल पाटील यांनी आभार मानले. यावेळी भगवान महाराज हांडे, निवृत्ती महाराज नामदास, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, भाऊसाहेब महाराज पाटील, बाबा महाराज राशिनकर, बापूसाहेब महाराज देहूकर, रामकृष्ण महाराज लहवितकर, श्रीकांत महाराज ठाकूर, नरहरी महाराज चौधरी, भानुदास महाराज यादव, संमेलनाध्यक्ष अमृत महाराज जोशी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com