आई-वडिलांच्या लग्नाचा पुरावा घेऊन कुठे येऊ?; रामराजेंचे प्रत्युत्तर 

Ramraje Naik Nimbalkar
Ramraje Naik Nimbalkar

फलटण : भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी एक हजार रुपये तयार ठेवावेत. माझ्या आई वडिलांच्या लग्नाचा पुरावा घेऊन घरी, कारखान्यावर का डेअरीवर येऊ, तेवढे मात्र सांगावे, असे जाहीर आवाहन करून तालुक्‍यातील जनतेने विरोधकांना घाबरू नये. तुमच्या केसालाही धक्का लागून देणार नाही, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. 

फलटण येथील अनंत मंगल कार्यालयात झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, बाजार समितीचे अध्यक्ष रघुनाथराजे नाईक निंबाळकर, दादाराजे खर्डेकर, सुभद्राराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्षा नीता नेवसे, महानंदाचे उपाध्यक्ष डी. के. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. 

या वेळी रामराजे म्हणाले, "रणजितसिंह यांनी "डीएनए'ची भाषा करू नये. त्यांचे वक्तव्य त्यांच्याच अंगलट येईल, तसेच रणजितसिंहने मला काय बोलायचे ते बोलावे; पण भाडोत्री माणसाला बोलायला सांगू नये.'' असा टोलाही त्यांनी जयकुमार गोरे यांचे नाव घेऊन लगावला. तालुक्‍यातील जनतेने घाबरून जाऊ नये. आम्ही तुमच्यासोबत आहोत. मी माझी हयात धोम- बलकवडीसाठी घालवली आहे. मी युवकांना व्यसनाच्या आहारी जाऊ दिले नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत तालुक्‍यातील जनतेने माझ्या आजपर्यंतच्या कामाची पोच देऊन मोठ्या मताधिक्‍याने आपल्या उमेदवाराला निवडणूक द्यावे, असेही आवाहन रामराजे यांनी केले. 

या वेळी संजीवराजे नाईक निंबाळकर यांनीही रणजितसिंह यांना जशास तसे उत्तर देणार असल्याचे सांगितले. या वेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्‍त केली. राष्ट्रवादीचे तालुका युवक अध्यक्ष जयकुमार इंगळे यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com