
सातारा : एशियन पेंटस् कंपनीतील 52 कामगारांना सात वर्षे होऊनही कायम केलेले नाही. 30 जानेवारीच्या मध्यरात्री सर्व कामगारांना कंपनीतून हाकलून देऊन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्वत:चा कॉन्ट्रॅक्टर नेमण्याचा घाट घातला आहे. येथील कामगारांवर ते अन्याय करत असून, माथाडी व फोरक्लिप कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे व रामराजेंच्या कार्यकर्त्याचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करावे, अन्यथा सर्व कामगार येत्या 15 दिवसांत सामूहिक आत्महत्या करतील, असा इशारा शिवलक्ष माथाडी ट्रान्स्पोर्ट व जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष अभिजित खंडागळे, फोरक्लिप कामगारांचे कायदेशीर सल्लागार ऍड. प्रशांत कांबळे, आप्पा खरात यांनी येथे नुकताच पत्रकार परिषदेत दिला.
शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत एशियन पेंटस् कंपनीचे 52 कामगार उपस्थित होते. श्री. खंडागळे, ऍड. कांबळे व श्री. खरात म्हणाले, ""केसुर्डी (ता. खंडाळा) येथील एशियन पेंटस् कंपनीतील माथाडी व फोरक्लिप कामगार सात वर्षांपासून काम करीत आहेत. कंपनीत या आधी एम. पी. एंटरप्राईजेस नावाचा कॉन्ट्रॅक्टर होता. त्याला सर्व कामगारांनी विरोध केला. मात्र, तो कामगारांवर लादण्यात आला. मात्र, जानेवारी 2020 रोजी त्याचा करार संपला. त्या जागेवर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्वत:चा कॉन्ट्रॅक्टर नेमण्याचा घाट घातला. त्यासही आमचा सर्वांचा विरोध आहे. माथाडी कायद्याची पायमल्ली करून माथाडी कॉन्ट्रॅक्टर नेमण्याचा प्रयत्न केला आहे. या कॉन्ट्रॅक्टरला प्रतिटन 150 रुपये प्रमाणे काम दिले असून, 16 टनाची गाडी खाली केल्याशिवाय हजेरी दिली जात नाही. कामगारांना प्रत्यक्ष 600 रुपये प्रतिदिनी हजेरी दिली जाते. प्रत्यक्षात कामगारांकडून 2400 रुपयांचे काम करून घेतले जाते. कॉन्ट्रॅक्टर व कंपनी 1900 रुपयांचा मलिदा खात आहेत. माथाडीमध्ये जेवढ्या टनाचे काम होते तेवढ्या टनावर 30 टक्के लेव्ही शासनाला भरावी लागते; पण हे ठेकेदार शासनाची फसवणूक करत आहेत.
वाचा ः Video : Shivjayanti2020 महाराज...आमचे ही रक्त सळसळतंय
यासंदर्भात विद्यमान कामगारमंत्री बच्चू कडू यांच्याकडे आम्ही तक्रार दिली होती. त्यांनी कंपनीच्या प्रशासनाला ठेकेदार नोंदीत करू नये, असे आदेश दिले आहेत. मात्र, रामराजेंनी दुसऱ्याच दिवशी आपल्या दालनात बैठक घेऊन कामगारमंत्री, कामगार आयुक्त यांच्यावर दबाव टाकून कंपनीत कॉन्ट्रॅक्टर नेमण्याचा घाट घातला.
रामराजेंचे "नो कमेन्टस्'...
या प्रकरणासंदर्भात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी या प्रकरणावर "नो कमेन्टस्' असे म्हणत काहीही बोलण्यास नकार दर्शविला.
हेही वाचा : शिवेंद्रसिंहराजे सुखरुप; पुढील उपचारार्थ मुंबईला रवाना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.