विद्यापीठाने पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अधिसुचना केली जारी

 Rani Channama University
Rani Channama Universitysakal

बेळगाव ः राणी चन्नमा विद्यापीठाने (आरसीयु) पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अधिसुचना जारी केली आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले असून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया १३ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. अखेरचा दिवस ३० ऑक्टोबर आहे. दंडासहीत शुल्क भरण्याची अखेरची तारीख ८ नोव्हेंबर आहे. त्यानंतर मेरीट लिस्ट लावली जाणार आहे. त्यानंतर यासंबंधीत काही आक्षेप असल्यास १३ नोव्हेंबरपर्यंत दाखल करावे. अंतीम मेरीट लिस्ट १५ रोजी जाहीर केली जाणार असून काऊंन्सिलिंग १६ नोव्हेंबरला होईल.

 Rani Channama University
अटलजींच्या भाषणाची क्लीप शेअर करत वरूण गांधींचा भाजपला घरचा आहेर

विद्यापीठाची पदव्यूत्तर केंद्र असणाऱ्या विजापूर, जमखंडी आणि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या बेळगाव, विजापूर आणि बागलकोट जिल्ह्यातील पदव्यूत्तर महाविद्यालय आणि संगोळी रायण्णा पदवीपूर्व महाविद्यालयातील विविध पदव्यूत्तर अध्ययन विभाग पदव्यूत्तर डिप्लोमा, योगा स्टडीज, आणि सर्टीफीकेट कोर्ससाठी २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षासाठी हे ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. या प्रवेशासाठी अधिसुचना विद्यापीठाच्या www.rcub.ac.in या वेबसाईटवर आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज ऑनलाईनद्वारे भरावेत. तर मुद्रीत प्रवेश अर्ज प्रती संबंधीत शैक्षणिक महाविद्यालयात द्याव्यात. असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com