'माण-खटावच्या पाणीप्रश्नाबाबत जयकुमार गोरेंना काडीची अक्कल नाही'

RanjitSingh Deshmukh
RanjitSingh Deshmukh

गोंदवले : माण-खटावच्या पाणीप्रश्नाबाबत काडीची अक्कल नसणाऱ्या माजी आमदार जयकुमार गोरेंनी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांच्याकडे शिकवणी लावावी, अशी खोचक टीका रणजितसिह देशमुख यांनी लगावला आहे.

'आमचं ठरलंय' टीमचे अधिकृत उमेदवार प्रभाकर देशमुख यांच्या प्रचारार्थ कुकुडवाड (ता.माण) येथे झालेल्या कोपरा सभेत रणजितसिह देशमुख बोलत होते. यावेळी उमेदवार प्रभाकर देशमुख, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, अनिल देसाई, संदीप मांडवे आदी मान्यवर उपस्थित होते.

रणजितसिह देशमुख म्हणाले, माण-खटाव तालुक्याच्या पाणीप्रश्नाबाबत माजी आमदार जयकुमार गोरे यांच्याकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे. उरमोडी, जिहे कठापुर, टेंभू, तारळी योजनेतील बाराखडी माहीत नसलेले गोरे स्वतःला जलनायक म्हणवून घेत आहेत. वास्तविक या पाणी योजना मार्गी लावण्यासाठी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनीच सुरुवातीपासून प्रयत्न केले आहेत. डॉ. येळगावकरांचा याबाबतचा गाढा अभ्यास आहे. या पाण्याचे वाटप होताना जादा पाणी माण-खटावच्या वाट्याला आणण्यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले आहेत. मात्र लबाड जलनायक पाणी मीच आणल्याचा कांगावा करत आहेत. वास्तविक पाण्याबाबत अज्ञानी असणाऱ्या माजी आमदारांनी या पाणी योजना व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी डॉ. दिलीप येळगावकर यांच्याकडे शिकवणी सुरु करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com